बातम्या

औषधी निलगिरी

Medicinal Eucalyptus


By nisha patil - 5/2/2024 7:35:13 AM
Share This News:



निलगिरीचे वनस्पतीपासून सुगंधी द्रव्योद्योग तेले, औद्योगिक तेले, औषधी तेले तयार केली जातात. संधिवातावरनिलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन चोळतात. भाजल्याने त्वचेला इजा होते, अशा वेळी निलगिरी तेलाचा उपयोग होतो. श्‍वासनलिकाचा दाह आणि जुनाट दम्यावर हे तेल उत्तेजक असून कफ पातळ करून पाडणारे आहे. नाकाच्या तक्रारींमध्ये निलगिरी तेल उपयोगी आहे. निलगिरीची मुळे रेचक आहेत. खोडाच्या सालींमध्ये टॅनिन असते. निलगिरीचा उपयोग अतिसार, जुनाट अमांश, कापणे, दंतवैद्यकीय औषधे इत्यादीत केला जातो. श्‍वासनलिकेच्या वरच्या भागात संसर्गजन्य विकार आणि काही कातडीचे रोग यांवर निलगिरी तेल उपयुक्त सिद्ध होते. पाणथळ जागेत, सांडपाण्याच्या दलदलीच्या जागेत निलगिरीची झाडे लावतात.


औषधी निलगिरी