बातम्या
जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व महसुल अधिकाऱ्यांची बैठक...
By nisha patil - 1/15/2025 4:09:29 PM
Share This News:
जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व महसुल अधिकाऱ्यांची बैठक...
१०० दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणी....
प्रलंबित महसुली प्रकरणे निकाली काढा : जिल्हाधिकारी अमोल येडगे
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व महसुली अधिकाऱ्यासमवेत बैठक घेण्यात आलीय. या बैठकीत कोल्हापूरातील जमिनीच्या फेरफारच्या नोंदी तातडीने पूर्ण करा, प्रलंबित महसुली प्रकरणे निकाली काढा अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मंगळवारी दिल्यात. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी १०० दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंबंधी सर्वांना सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व महसुली अधिकाऱ्यासमवेत बैठक घेण्यात आलीय. या बैठकीत कोल्हापूरातील जमिनीच्या फेरफारच्या नोंदी तातडीने पूर्ण करा, काम होण्यासारखे असेल तर विनाकारण नागरिकांची अडवणूक करू नका, प्रलंबित महसुली प्रकरणे निकाली काढा अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मंगळवारी दिल्या. विधानसभा निवडणूक, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणामुळे महसुली अधिकाऱ्यांची बैठक झाली नाही. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी १०० दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंबंधी सर्वांना सूचना दिल्या आहेत.
तसेच सर्व विभागांना व कार्यालयांना त्यादृष्टीने उद्दिष्टये नेमून देण्यात आली आहे. हातकणंगलेत शिधापत्रिका काढून देण्यासाठी नागरिकांकडून हजार- दोन हजार रुपये उकळले जात असल्याच्या प्रकारावर त्यांनी नाराजी व्यक्त केलीय. तसेच पुरवठा विभागाला या प्रकरणात कडक तपासणी व कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेत. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार व नायब तहसीलदार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व महसुल अधिकाऱ्यांची बैठक...
|