राजकीय

शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात महापालिका प्रशासनासोबत दोन्ही आमदारांची बैठक

Meeting of both the MLAs with the municipal administration regarding various issues in the city


By surekha -
Share This News:



शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात महापालिका प्रशासनासोबत दोन्ही आमदारांची बैठक
 

काळमवाडी थेट पाईपलाईन योजनेसह कोल्हापूर शहरातील विविध प्रश्न संदर्भात आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार जयश्री जाधव यांनी महापालिका प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली यावेळी थेट पाईपलाईन योजनेचे काम संबंधितांनी गांभीर्याने घ्यावे आणि कामातील दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही अशा शब्दात दोन्ही आमदारांनी अधिकाऱ्यांची कान उघडणी केली.
ताराबाई पार्क इथल्या निवडणूक कार्यालयात महापालिकेच्या प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्यासह विविध अधिकाऱ्यांसोबत आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार जयश्री जाधव यांनी आढावा बैठक घेतली थेट पाईप लाईन संदर्भात आढावा घेत असताना संबंधित प्रलंबित कामे मे अखेर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी दिल्या तर आमदार जयश्री जाधव यांनी थेट पाईपलाईन चे काम संत गतीने सुरू असून जॅकवेल चे काम देखील अद्याप प्रलंबित असल्याबाबत प्रशासनाला खडे बोल सुनावले जाणीवपूर्वक हा प्रोजेक्ट संबंधित कंपनी लांबणीवर पडत आहे का अशी विचारणा यावेळी आमदार जाधव यांनी केली. थेट पाईपलाईन कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही अशा शब्दात दोन्ही आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांची कान उघडणे केली आहे या बैठकीला अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई जल अभियंता नेत्रदीप सरनोबत मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांच्यासह माजी नगरसेवक शारंगधर देशमुख नियाज खान राजेश लाटकर उपस्थित हो
ते.


Meeting of both the MLAs with the municipal administration regarding various issues in the city