बातम्या

भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोमवारी जेष्ठ नागरिकांचे संमेलन

Meeting of senior citizens on Monday on behalf of Bharatiya Janata Party


By nisha patil - 6/25/2023 10:28:33 AM
Share This News:



इचलकरंजी : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला  यशस्वी नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल   इचलकरंजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोदी @९ कार्यक्रम अंतर्गत इचलकरंजी विधानसभा परिसरातील जेष्ठ नागरिकांचे संमेलन सोमवार दि. २६ जून  रोजी दुपारी ४.३० वाजता भाजपा शहर कार्यलय येथे आयोजित केले आहे. 

या संमेलनात मोदी @९ अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या नऊ वर्ष सुशासन कार्यकाळातील लोकाभिमुख लोकप्रिय योजनांची माहिती ज्येष्ठ नागरिकांना देत संवाद साधला जाणार आहे. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष  सुरेश हाळवणकर हे जेष्ठ नागरिकांशी
संवाद साधणार आहेत.याचबरोबर शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी इचलकरंजी शहर परिसरात जेष्ठ नागरिकांनी या संमेलनात सहभाग घ्यावा , असे आवाहन भाजपचे जेष्ठ नेते धोंडीराम जावळे,दीपक राशिनकर, पांडुरंग म्हातुगडे यांनी केले आहे .


भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोमवारी जेष्ठ नागरिकांचे संमेलन