बातम्या

मेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी

Mega Pool at Campus Drive 48 jobs for pharmacy students


By nisha patil - 2/5/2024 5:25:17 PM
Share This News:



कोल्हापूर विभागातील फार्मसीच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या मेगा पूल कॅम्पस ड्राईव्हद्वारे ४८ विद्यार्थ्यान विविध कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे. 
 
  डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी व सिरी एज्युटेक, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 28 एप्रिल रोजी झालेल्या या ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, डी. वाय. पाटील फार्मसीचे प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे यांच्याहस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. कोल्हापूर, बेळगाव, सांगली कराड, बार्शी व सोलापूर येथून सुमारे 134 विद्यार्थ्यांनी आपली नावे नोंदविली होती.  

    विद्यार्थ्यांना अन्य शहरांमध्ये न जाता कोल्हापूरमध्येच मुलाखत देऊन नोकरीचे दालन खुले करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एकाच छताखाली दहा नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधीनि यावेळी मुलाखती घेतल्या.  यावेळी  विद्यार्थ्यांच्या पात्रतेनुसार एप्टीट्यूड टेस्ट व ग्रुप डिस्कशनचा समावेश होता. त्यानंतर पर्सनल इंटरव्यू झाले. यामध्ये 48 विद्यार्थ्यांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली. डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या 11 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता व त्यापैकी 6 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
    
या मेगा पूल कॅम्पस ड्राईव्हसाठी  गोवा मधून झायडस कॅडीला, युनिकेम लॅब, मुंबई मधून वेलनेस फॉरेवर, जेनेरीकार्ट, आर्डेंट क्लिनल, ग्रुप फार्मा या नामांकित कंपन्यांनी उपस्थिती लावली होती. प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे व तसेच सिरी एज्युटेक तर्फे सचिन कुंभोजे, विश्वजीत काशीद आणि प्रद्युम्न मगदुम यांचे मार्गदर्शन लाभले 

   कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी सर्व  यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


मेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी