बातम्या
मेरी मिट्टी मेरा देश अभियान बहिरेश्वर गावात शहाजी महाविद्यालयाच्या वतीने संपन्न
By nisha patil - 8/14/2023 3:59:01 PM
Share This News:
कोल्हापूर: मेरी मिट्टी मेरा देश अभियानांतर्गत बहिरेश्वर तालुका करवीर येथे शहाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आजी माजी सैनिकांचा व त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. तसेच गावातील वीर जवानांच्या सन्मानार्थ शीलाफलकाचे अनावरण, पंचप्रण शपथ वाचन, वृक्षारोपण यासह विविध उपक्रम संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. टी.एम.चौगुले हे होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्याची आणि सामाजिक बांधिलकीची माहिती त्यांनी यावेळी दिली.
सेवानिवृत्त सैनिक निवृत्ती शंकर दिंडे यांनी स्वातंत्र्यसैनिक व जवानांच्या वतीने सत्कारास उत्तर दिले. स्वागत व प्रास्ताविक एन एस एस कार्यक्रमाधिकारी डॉ. डी. एल. काशिद पाटील यांनी केले तर आभार डॉ. एस. डी. जाधव यांनी मांनले. डॉ. निता काशीद पाटील,प्रा.शुभम पाटील अतुल कांबळे यांनी संयोजन केले. यावेळी माजी सरपंच मारूती चव्हाण, के. एन दिंडे ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे व मानद सचिव श्रीमती संगीता विजयराव बोंद्रे यांचे या उपक्रमास प्रोत्साहन मिळाले.
मेरी मिट्टी मेरा देश अभियान बहिरेश्वर गावात शहाजी महाविद्यालयाच्या वतीने संपन्न
|