बातम्या

प्रायव्हेट हायस्कूलमध्ये मेरी मिट्टी मेरा देश अभियान

Meri Mitti Mera Desh Abhiyan in Private High School


By Administrator - 8/14/2023 6:02:17 PM
Share This News:



 भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या उंबरठ्यावर मेरी मिट्टी मेरा देश अभियान पूर्ण भारतभर साजरे करण्यात येत आहे या अभियानांतर्गत  विविध उपक्रम साजरा करण्याच्या प्रशासकीय आदेश प्राप्त झाला आहे या आदेशाप्रमाणे आज प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूर येथे पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या बरोबरच एनसीसीच्या एअर विंग व आर्मी विंग च्या मुला मुलींनी आज सकाळी  ध्वजारोहनानंतर 14 ऑगस्ट रोजी प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांच्या तसेच शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी. आप्तेष्ट मित्रमंडळी शासकीय अधिकारी यांच्या खिशावर 15 ऑगस्ट रोजी लावण्यासाठी तिरंगी बॅच तयार करण्याचा उपक्रम आयोजित केला होता  कला विभाग प्रमुख प्रशांत जाधव सर विश्वास शिंदे  एनसीसी विभाग प्रमुख श्री डी एम रेडेकर ,श्रीमती एम एन माने, जिमखाना प्रमुख गणबावले, पर्यवेक्षक पीएम जोशी  उपमुख्याध्यापक गिरीश जांभळीकर तसेच मुख्याध्यापिका सौ वंदना डेळेकर  यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम साजरा करण्यात आला या उपक्रमासाठी एनसीसीच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्हाट्सअप द्वारे व वर्गामध्ये तिरंगा बॅच तयार करण्याचे कुशल मार्गदर्शन  श्री प्रशांत जाधव सर यांनी केले होते  देशभर साजरा होणाऱ्या मेरी मिट्टी मेरा देश अभियानाच्या  या उपक्रमाच्या दरम्यान. श्री राजेंद्र जाधव सरांनी विद्यार्थ्यांना  माहिती सांगितली गेली या उपक्रमामध्ये सातशे विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला .पालकांनीही या उपक्रमाचे विशेष कौतुक केले ; देश प्रेम व देशभक्ती विद्यार्थ्यांच्या अंगी शालेय जीवनापासूनच तिरंग्याची कल्पकता कुशलतेने आपल्या कार्यकृतीतून सादरीकरण व्हावे हा या उपक्रमाचा उद्देश होता

 

For More Details


प्रायव्हेट हायस्कूलमध्ये मेरी मिट्टी मेरा देश अभियान