बातम्या

चौगुले विद्यालयाचा गुणवत्तेत चढता आलेख

Merit graph of Chaugule Vidyalaya


By nisha patil - 1/25/2024 12:47:36 PM
Share This News:



चौगुले विद्यालयाचा गुणवत्तेत चढता आलेख

वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

उघड्या माळावर के.एस.आण्णांनी शिक्षणाची गंगोत्री उभारली - खा.धैर्यशील माने

पन्हाळा तालुक्यातील कोतोली पैकी माळवाडी येथील फोंड्या माळावर डॉ. के.एस.चौगुले आण्णा यांनी  पश्चिम भागातील विद्यार्थ्यांना  शिक्षणाची गंगोत्री उभारुन सर्वसामान्य जनतेची सेवा उपलब्ध करून दिली आहे. श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव देण्यासाठी  स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. यात विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी खासदार धैर्यशील माने,भाजपा ग्रामीण अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, संस्थापक डॉ. के.एस.चौगुले,सचिव शिवाजीराव पाटील,प्राचार्य विजयकुमार पाटील, जि.प.सदश्यां कल्पना चौगुले, प्रा.धनंजय झोंबडे,प्राचार्य जे.के.पवार,प्रा.शितल  चौगुले,तालुका अध्यक्ष अमरसिंह भोसले आदीसह पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


चौगुले विद्यालयाचा गुणवत्तेत चढता आलेख