बातम्या

मिनचे येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Meritorious students felicitated at Minche


By nisha patil - 6/30/2023 5:33:06 PM
Share This News:



तारा न्युज वेब टीम : कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) मिणचे येथील हजरत पीर उरूस या उरसानिमित्त कै. इंदिरा मिणचेकर कै. वसंत मिणचेकर यांच्या स्मरणार्थ वैभव म्युझिकल आर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन मा. आमदार डॉ सुजित मिणचेकर यांच्याकडून करण्यात आला होता.याचे उद्घाटन मा.आमदार डॉ सुजित मिणचेकर (संचालक गोकुळ दूध संघ कोल्हापूर)* यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच शासकीय पदी नियुक्ती झालेल्या व 10 व 12 मधील उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.

उद्घाटन व सत्कार कार्यक्रम प्रसंगी अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव,रणजीत मिणचेकर,  इंद्रजीत मिणचेकर, शिवाजी पवार सर,सतीश घाटगे ,अनिल जाधव, तानाजी पवारसर,धनाजी भोसले, संभाजीराव जाधव, बाजीराव चव्हाण,सरपंच सौ रंजना जाधव, उपसरपंच सौ दिपाली घाटगे, तंटामुक्ती अध्यक्ष सचिन नलवडे, बाळासाहेब जाधव, पोलीस पाटील , कमिटीचे अध्यक्ष सर्जेराव अक्षय उपाध्यक्ष दिनकर घाडगे उमेश भंडलकर, ग्रामपंचायत सदस्य अभिनंदन शिखरे,सौ सावित्री नाईक, सौ सविता वाकसे,अजय कांबळे, जब्बार मोमीन, सुजित वायदंडे, सौ नीलम घाडगे, महादेव परीट, सौ. नलिनी जाधव,रणजीत संकपाळसर, मच्छिंद्र नाईक, पिंटू वाकसे,युवराज घाडगे, इम्तियाज मोमीन,काशिनाथ वाकसे, अशोक शिखरे, इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.


मिनचे येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार