बातम्या

‘मेरी ख्रिसमस’झळकणार 12 जानेवारीला

Merry Christmas will be released on January 12


By nisha patil - 12/27/2023 5:03:22 PM
Share This News:



‘मेरी ख्रिसमस’झळकणार 12 जानेवारीला

कॅटरिना कैफ आणि विजय सेतुपति यांचा चित्रपट ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाचा ट्रेलर निर्मात्यांनी सादर केला आहे. श्रीराम राघवन यांच्या दिग्दर्शनात तयार या चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.  हा एक थ्रिलर धाटणीचा चित्रपट असून तो 12 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. विजय सेतुपतिचा मोठा चाहतावर्ग पाहता या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळणार असल्याचे मानले जात अहे. कुणी कुणासोबत वाईट केले किंवा कुणी कुणाला फसविले? कोण गुन्हेगार आहे? हे ट्रेलर पाहून ठरविणे अत्यंत अवघड आहे. बदलापूर आणि अंधाधुन हे चित्रपट पाहिले असतील तर श्रीराम राघवन यांनी स्वत:चा हा नवा चित्रपट कितपत थ्रिलरयुक्त केला असेल हे तुम्हाला कळून चुकेल. या चित्रपटातील ट्विस्ट आणि सस्पेन्स चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकविणारे आहे.

या चित्रपटाद्वारे कॅटरिना कैफ आणि दिग्दर्शक श्रीराम राघवन हे तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. तर विजय सेतुपतिचा हा तिसरा हिंदी चित्रपट आहे. विजय यापूर्वी ‘जवान’ आणि ‘फर्जी’मध्ये दिसून आला होता. ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटात कॅटरिना आणि विजय सेतुपतिसोबत संजय कपूर, विनय पाठक आणि राधिका सरतकुमार यांच्यासह अनेक कलाकार दिसून येणार आहेत.


‘मेरी ख्रिसमस’झळकणार 12 जानेवारीला