विशेष बातम्या

योगा करण्याची पद्धत

Method of doing yoga


By nisha patil - 6/15/2023 7:00:44 AM
Share This News:




योगा करणे हे आपल्या जिवनासाठी खूप महत्त्वाचे आहे. परंतु योग करताना योगाची योग्य पद्धत समजून योग करणे आपल्या शरीराला फायदेशीर ठरू शकते.योगा करण्यासाठी असणाऱ्या महत्त्वाच्या पद्धती पुढीलप्रमाणे आहेत.

 ध्यान :- 
ध्यान करणे हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. रोज काही मिनिटे आपण डोळे झाकून ध्यानाच्या स्थितीत बसल्यास शरीरामध्ये आणि मनामध्ये शक्तीचा संचार होतो. विशेषता सकाळच्यावेळी ध्यान केल्याने मन प्रसन्न आणि एका विशिष्ट दिशेने कार्यरत राहते. मन एकाग्र आणि शांत राहते. त्यामुळे आपला ताण तणाव नाहीसा होतो.

 शलभासन  :-
बराच व्यक्तींना पाठ आणि कमरेचा त्रास होत असतो विशेषतः महिलांना. गरोदर पणा नंतर सहसा सर्वच महिलांना कमरेचा आणि पाठीचा त्रास होतो. अशावेळी शलभासन हे आसन केल्याने हा त्रास कमी होण्यास मदत होतेे. या आसनामुळे पाठाचे आणि कंबर यांचे स्नायू बळकट होतात. शलभासन हे आसन नियमित केल्याने कमरेचा आणि पाठीचा त्रास कायमस्वरूपी नाहीसा होण्यास मदत होते.

 नाडी शोधन प्राणायाम  :-
आपल्या संपूर्ण शरीराची शुद्धी करायचे असेल तर नाडी शोधन प्राणायाम फायदेशीर ठरते. या प्राणायाम मध्ये दीर्घ श्वास घेऊन सोडायचा असतो. त्यामुळे आपल्या श्वासावर नियंत्रण राहते. त्यामुळे हा योगाचा प्रकार शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतो. 

भुजंगासन :- 
प्रत्येक आसन हे आपल्या शरीरासाठी कुठल्या ना कुठल्या प्रकारे फायदेशीर ठरते. छाती आणि शरीरातील मांसपेशी दूर करण्यासाठी व कंबरेतील तणाव दूर करण्यासाठी हे प्राणायाम फायदेशीर ठरते. मंरूदंड संबंधित आजारी व्यक्तींना हे व्यायाम केल्याने खूप फायदा होतो. महिलांना गर्भाशयातील रक्तभिसरण प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठी भुजंगासन आसनाची खूप मदत होते.

 अर्ध चक्रासन :-
ज्या व्यक्तींना व्  मधुमेहा सारखा आजार असतो त्यांना अर्ध चक्रासन उपयुक्त ठरते. तसेच पोटातील चरबी पासून मुक्तता हवी असेल तर त्यावर अर्ध चक्रासन हा उत्कृष्ट उपाय आहे. हे आसन केवळ मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने करावे.


योगा करण्याची पद्धत