बातम्या

मेक्सिको हादरले! 45 बॅग्स अन् त्यात चक्क मानवी शरीराचे अवशेष

Mexico shook 45 bags with human body remains in them


By nisha patil - 2/6/2023 9:03:33 PM
Share This News:



 तारा न्यूज वेब टीम उत्तर अमेरिकेतील मेक्सिको  पुन्हा एकदा एका अमानवी कृत्यामुळे हादरुन गेला आहे. मेक्सिकोमध्ये काही बॅगमध्ये मानवी शरीराचे तुकडे सापडले आहेत. मेक्सिकोमधील जेलिस्को या राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून 7 बेपत्ता लोकांचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. याचदरम्यान गुरुवारी स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 45 अशा बॅग सापडल्या आहेत ज्यामध्ये मानवी शरीराचे तुकडे आहेत. तसेच या सर्व बॅग एका खड्ड्यात सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 
पोलिसांनी त्यांच्या माहितीमध्ये म्हटले आहे की, "या 45 बॅगमध्ये महिला आणि पुरुषांच्या शरीराचे तुकडे सापडले आहेत." पोलिसांना मंगळवारी जेलिस्कोमधील जापोपन या उपनगराती नगर पालिकेच्या परिसरात एका खड्ड्यात शरीरराचे तुकडे असलेली ही बॅग्स मिळाली. 
मेक्सिकोमधील जेलिस्को पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस मागील एक आठवड्यापासून सात बेपत्ता लोकांचा तपास करत आहेत. यामध्ये 30 वर्षांच्या दोन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. ही सगळी जण गेल्या महिन्याच्या 20 तारखेपासून बेपत्ता आहेत. तसेच या सर्व लोकांच्या बेपत्ता झाल्याच्या तक्रारी वेगवेगळ्या दिवशी आणि वेगवेगळ्या ठिकाणी नोंदवण्यात आल्या होत्या. परंतु तपास करताना असे निदर्शनास आले की ही सर्व माणसं एकाच कॉल सेंटरमध्ये काम करत होती. 
तसेच ज्या भागातून शरीराचे हे तुकडे सापडले त्याच भागात हे कॉल सेंटर असल्याचं देखील पोलिसांच्या लक्षात आलं. पंरतु फॉरेंसिक तज्ञांनी मृत्यू झालेल्या लोकांची संख्या आणि त्यांच्या ओळखीविषयी कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही. पोलिसांना सुरुवातीच्या तपासात समजले की, या कॉल सेंटरमध्ये काही अवैध कामं केली जात होती. तसेच माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरुन पोलिसांना रक्ताचे डाग असलेले कपडे आणि इतर काही सामान मिळाले आहे.


मेक्सिको हादरले! 45 बॅग्स अन् त्यात चक्क मानवी शरीराचे अवशेष