बातम्या

सर्व वयोगटासाठी दूध आवश्यक, होतील ‘हे’ फायदे

Milk is necessary for all age groups


By nisha patil - 3/18/2024 7:31:29 AM
Share This News:



पूर्णान्न असलेल्या दुधात प्रोटिन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मोठ्याप्रमाणात असतात. आपल्याकडे लहान मुलांना दूध आवर्जून दिले जाते. अनेकदा पालक दूध पिण्यासाठी मुलांना जबरदस्ती करतानाही दिसतात. कारण दूध मुलांच्या सर्वांगिण वाढीसाठी खूप महत्वाचे आहे हे पालकांना माहित असते. परंतु, एका विशिष्ट वयापर्यंतच दूधाचे सेवन केले जाते. त्यानंतर चहा, कॉफी अशी पेये घेतली जातात. मुळात दूध हे जेवढे लहान मुलांसाठी आवश्यक आहे. तेवढेच ते प्रौढांना व वयस्कर  व्यक्तींनाही लाभदायक आहे. यामुळे सर्वच वयोगटातील व्यक्तींनी दूध घेतले पाहिजे. दूध हा कॅल्शिअयमचा स्रोत असल्याने हाडे मजबूत होतात.

फुल क्रिम दुधात ४ टक्के फॅट, व्हिटॅमिन ए आणि डी असतात. २ वर्षांपर्यंतच्या लहान मुलांना हे दूध दिले जाते. तर टोन्ड दुधात ३ टक्के फॅट असते. तर व्हिटॅमिन ए, डी आणि कॅल्शियमचे प्रमाण हे फूल क्रिम दुधात तेवढेच असते. हे दूध प्रौढांसाठी चांगले असते. स्किम मिल्क दुधातील फॅट काढून घेताना त्यातील नैसर्गिक व्हिटॅमिनही बाहेर पडतात. त्यामुळे त्यात नंतर व्हिटॅमिन ए आणि डी घातले जातात. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. दुधामुळे हाडे आणि दात मजबूत होतात. दूध आणि त्या पासून बनलेल्या पदार्थांपासून दात आणि हाडांना आवश्यक असलेले कॅल्शिअम, फॉस्फरस आणि प्रोटिन मिळते. शिवाय दुधाने रक्तदाब नियंत्रणात राहतो.

फळे आणि भाज्या यांच्यासह दूध हा कमी मिठाचा आहार असल्याने उच्च रक्तदाब कमी होतो. दूध प्यायल्याने हृदयासंबंधीच्या आजारांचा धोका कमी होतो. दुधात कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊन हृदयविकार बळावत नाहीत. शिवाय दररोज लो फॅट मिल्क म्हणजे कमी चरबीयुक्त दुधाचे सेवन केल्याने टाईप २ डायबेटिजचा धोका कमी होतो. दूध किंवा दुग्धजन्य पदार्थां अभावी शरीरात कॅल्शिअमची कमतरता निर्माण होऊन ऑस्टिओपोरोसिस होतो. म्हणून हाडांना बळकटी यावी यासाठी प्रौढांनी दूध प्यायले पाहिजे.


सर्व वयोगटासाठी दूध आवश्यक, होतील ‘हे’ फायदे