बातम्या
रोजंदारी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू
By nisha patil - 12/22/2023 4:52:44 PM
Share This News:
महापालिके 523 रोजंदारी कर्मचारी कार्यरत असून गेल्या अनेक वर्षापासून ते काम करत आहेत या कर्मचाऱ्यांना जुलै 2023 पासून महापालिकेच्या वतीने किमान वेतन सुधारित दर लागू करण्यात आले आहेत याच प्रशासक के मंजू लक्ष्मी यांनी मान्यता दिली असून त्यानुसार त्यांना सुधारित वेतन नोव्हेंबर महिन्यापासून पगारात समाविष्ट करण्यात येणार आहे यासाठी महापालिकेच्या वतीने प्रति
कर्ममाचाऱ्यांच्या पगारात महिन्याला 2340 रुपयाची वाढ झाली आहे यामुळे महिन्याला नऊ लाख पन्नास हजार रुपयांचा बोजा महापालिकेवर पडणार आहे त्याचबरोबर मागील फरकापोटी सुमारे 40 लाखाचा फरक अदा करावा लागणार आहे गेल्या अनेक वर्ष रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून पगारवाढीची मागणी होत होती किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार तरी द्यावा अशी मागणी होत होती कर्मचारी संघाने प्रशासनाकडे तशी मागणी केली होती त्यामुळे किमान वेतन कायद्यानुसार पगार देण्यास महापालिका प्रशासकी मंजू लक्ष्मी आणि बुधवारी मान्यता दिली जुलै 2023 पासून फरकासह हा पगार देण्यात येणार असल्याने या कर्मचाऱ्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे
रोजंदारी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू
|