बातम्या
सीपीआर मधील रुग्णांसाठीच्या 'वस्तू विक्री केंद्रा'ला मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली भेट
By nisha patil - 7/30/2023 11:15:40 PM
Share This News:
कोल्हापूर, दि.30 : सीपीआर रुग्णालयात दाखल रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी सुरु करण्यात आलेल्या 'आवश्यक वस्तूंची 50 टक्के दराने विक्री केंद्रा'ला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते रुग्णांच्या नातेवाईकांना प्रातिनिधिक स्वरुपात मोफत भोजन वाटप करण्यात आले. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.आरती घोरपडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश कांबळे, विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, अभय वंटे, राहुल चिकोडे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील यांच्या सेवाभावी उपक्रमातून सुरु केलेल्या या विक्री केंद्रामध्ये टूथपेस्ट, दंतमंजन, टूथब्रश, सॅनिटायझर, मास्क, मिनरल वॉटर, बिस्किटे, चॉकलेट आदी विविध वस्तूंचा समावेश आहे. सीपीआर मधील रुग्णांच्या सेवेसाठी सचिन घरपणकर- 9284049545 यांच्याशी तर वस्तू विक्री केंद्रासाठी नितीन कांबळे-9096502028, मयूर पाटील- 7020828914 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी यावेळी केले.
सीपीआर मधील रुग्णांसाठीच्या 'वस्तू विक्री केंद्रा'ला मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली भेट
|