बातम्या

सावधान…! कोविड फैलावतोय; वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवा– मंत्री हसन मुश्रीफ

Minister Hasan Mushrif


By nisha patil - 12/21/2023 1:34:42 PM
Share This News:



सावधान…! कोविड फैलावतोय; वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवा– मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर  कोविड जेएन 1 या व्हेरियंटचा प्रसार जगभर वेगाने होत आहे. यासाठी पुर्वानूभव लक्षात घेता वेळीच दक्षता आणि सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. त्यामुळे संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी डॉक्टरांचे पथक, मुबलक औषधसाठा व कोविड तपासणी किट उपलब्ध करून देण्याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज संबंधित विभागांना सुचना केल्या.

मिळालेल्या माहितीनुसार कोविड – 19 च्या नव्याने उद्भवलेल्या व्हेरियंटचा प्रादुर्भावाबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यात कोविडच्या नव्याने निर्माण झालेल्या जेएन 1 या व्हेरियंटबाबत नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता बाळगणे गरजेचे असल्याचे सांगून श्री. मुश्रीफ म्हणाले की, आपण सर्वांनी सावधगिरी बाळगण्याबाबत केंद्र शासनामार्फतही सूचना केल्या.

देशात 19 डिसेंबर 2023 पर्यंत 2 हजार 311 रुग्ण आढळले असून केरळमध्ये 2 हजार 41 रुग्ण असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर गोव्यामध्ये 15 रुग्णांची नोंद झाली आहेत. तामिळनाडू 14 तर महाराष्ट्रामध्ये 11 रुग्णांची नोंद झाली आहे. परंतु नागरिकांनी न घाबरता कोविड मार्गदर्शक तत्वे तसेच त्रिसुत्रींचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.


सावधान…! कोविड फैलावतोय; वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवा– मंत्री हसन मुश्रीफ