बातम्या

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा

Minister Hasan Mushrif District Tour


By nisha patil - 2/24/2024 3:53:46 PM
Share This News:



पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा

कोल्हापूर :   वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 7 ते 10 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ: कागल निवासस्थान) सकाळी 10.30 वाजता श्री संत रोहिदास जयंती निमित्त पूजन आणि भेट.

(स्थळ: सांगाव नाका, कागल) सकाळी 11.30 वाजता प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक. दुपारी 3.30 ते 4 वाजता राखीव. दुपारी 4 वाजता सुर्यकांत पाटील यांच्या वडिलांच्या निधन पश्चात सांत्वनपर भेट.

(स्थळ: बाचणी, ता. कागल) सायं. 5 वाजता दैनिक तरुण भारत, गडहिंग्लज विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त भेट. (स्थळ: गडहिंग्लज) सायं. 6 वाजता तमनाकवाडा येथील विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: तमनाकवाडा, ता. कागल) सोयीनुसार कागलकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ: कागल निवासस्थान)

रविवार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 7 ते 9 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ: कागल निवासस्थान) सकाळी 9.30 वाजता कागल निवासस्थानाहून कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण


पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा