बातम्या

मंत्री पाटील यांचे घर आणि भाजपच्या कार्यालयाला पोलिस छावणीचे स्वरुप

Minister Patils house and BJP office turned into a police camp


By nisha patil - 10/31/2023 9:02:47 PM
Share This News:



मराठा आरक्षणाचा तिढा सुटत नसल्याने आंदोलक आक्रमक बनले आहेत. राज्यात ठिकठिकाणी मंत्री आणि आमदारांची घरे, कार्यालये आंदोलकांकडून लक्ष्य केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी खबरदारी घेऊन आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर येथील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे 

मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळणलागल्याने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर येथील घरासमोर पोलिसांनी सशस्त्र बंदोबस्त तैनात केला आहे. नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयाच्याही सुरक्षेसाठी पोलिस तैनात केले आहेत. त्यामुळे मंत्री पाटील यांचे घर आणि भाजपच्या कार्यालयाला पोलिस छावणीचे स्वरुप आले आहे.

कोणतीही अनुचित घटना घडू नये या पार्शवभूमीवर प्रशासनाने खबरदारी घेऊन हा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे


मंत्री पाटील यांचे घर आणि भाजपच्या कार्यालयाला पोलिस छावणीचे स्वरुप