ताज्या बातम्या

भारतीय सुगंधि गरम मसाल्याचे चमत्कारिक फायदे

Miraculous Benefits of Indian Aromatic Garam Masala


By nisha patil - 2/21/2025 9:19:54 AM
Share This News:



 जिरे. अतिशय थंड गुणधर्मामूळे सर्वच प्रकारच्या उदर विकारावर गुणकारि आहे, अम्लपित्त, अरूचि, अपचन, वायूविकार, दूर करून शरिरातलि उष्णता कमि करते. श्वेतप्रदर, गर्भाशयाचि सूज बरि करते.. कोलेस्ट्रोल नियंत्रित राहते .अतिरिक्त चरबी कमी होते, डोळे चमकदार होतात.  त्वचा तरूण राहते, नेहमि सेवन केल्यास..  vitamin..E. असल्याने मुरूमांचे डाग जातात, उन्हाळ्यांत  जिरे+खडिसाखर खाल्ल्यास उन बाधत नाहि, ,, जिरेकाद्यारिष्ट,, हे एक उत्तम पित्तविकारावर औषध आहे..

दालचिनि.. उष्ण प्रक्रुतिचे, आहे, मुरडा, आतड्याचि सूज, पोटदुखि, ग्रहणि, आर्तवशूल, पित्ताच्या उलट्या, मलावरोध, ईत्यादि विकारांत उपयुक्त आहे. फ्ल्यू,  थंडितापात काढ्यांत याचा वापर केल्यास ताप उतरतो., तोंडाला, रूचि नसणे, खोकला, आवाज बसणे, यासाठि खडिसाखरेसोबत घ्यावे.,, सितोपलादि चूर्णात,, हि प्रमूख घटकद्रव्य आहे.. अनेक प्राश, अवलेह, विवीध टाँनिक मद्ये याचा वापर केला जातो.रक्ताभिसरण चांगले होउन रक्ताच्या गूठळ्या, वितळतात, त्यामूळे ब्लडप्रेशर नाँर्मल राहते. ह्रुदयविकार होत नाही...

धने.. . अतिशय थंड गुणधर्म आहे. युरिन स्वच्छ होते, अंगातलि कडकि, उष्णता, बाहेर काढतात. डोळ्यांचि जळजळ, कमि होते सेवन केल्यास व चष्म्याचा नंबर कमि होतो.. गोवर, कांजण्या, तीव्र ताप,  या विकारांत धने ठेचून पाण्यांतून गाळुन पिल्यास दाह होत नाही. किडन्या  साफ ठेवतात.H.D.L. गूड कोलेस्ट्रोल वाढवते, इम्यूनिटि सिस्टम मजबूत करतात सर्दि खोकला बरा करतात., अल्सर, मधूमेह, अँनिमिया या विकारांवर उत्तम उपयोग होतो.।

लवंग.. एक गुणकारि,, अँटिबायोटिक,, म्हणून खुपच उपयोगि आहे. दातदूखी बरि करते, सर्दि खोकला झाल्यास काढ्यातून वापर करतात, मुखवास म्हणून उत्तम..  याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते. अपचन, मळमळ, उलटि थांबवते., अम्लपित्त, सांधेदुखीवर लाभदायि.. याचे तेल  सांध्यावर मालिश करून लावतात. भूक वाढते पोटातले रस सुटून...

वेलचि( विलायचि)..  हा एक अतिशय सुगंधित मसाला आहे. आल्याचा तुकडा, लवंग, व थोडे धने वाटून त्याचि पावडर गरम पाण्यातून घेतल्यास अपचन दूर। होते, मळमळ, उलटि, यावर उपयोगि आहे. तोंडाचि दुर्गंधि दूर करते. व मन प्रसन्न करते. अम्लपित्त, दूर करते, सर्दी, कफ, यावर गरम पाण्याचा वाफारा घ्यावा वेलचिचे तेल टाकून. वेलचि खाण्याने पोटाच्या आतिल लेअर्स मजबुत होतात.  यांत पोटँशिअमचि मात्रा भरपुर असल्याने ह्रदयविकार बरे होतात. ब्लडप्रेशर सामान्य राहते.

केशर..  एक सौंदर्यवर्धक आहेच, पण पोटाकरता, पचनसंस्थेवर चांगले काम करते. सर्दिवर दूधांत टाकुन घ्यावे, स्रियांच्या गायनिक प्राँब्लेमवर उत्तम काम करते. हिस्टेरिया, श्वेतप्रदर,  यावर दूधातून केशर घ्यावे. ताकद देते. डोळ्यांचे विकार, मोतिबिंदू, वर गुणकारि.. हिरड्यांचि सूज, व सर्वच मुखविकारावर उत्तम.. केशरामुळे स्मरणशक्ति वाढते, अल्झायमर  सारखा आजार आटोक्यात राहतो. श्वसनसंस्थेचे आरोग्य चांगले राहते. सध्याच,, कँसर,, सारख्या दुर्दम्य रोगावर औषध तयार  करण्यात येत आहे..

मिरे..,, पित्तप्रकोपि, तीक्ष्णोष्णं रूक्षं दीपनरोचनम्।। रस पाकेच् कटुकं कफघ्नं।

  ,,त्रिकटु,, या औषधांत प्रमुख भूमिका आहे याचि.
,, अग्निमांद्य,, मिरे दूर करते. सर्व धातूंच्या अवयवांना उष्णता देऊन तिथले कफज दोष दूर करते. तापांत , मिरे, हे काढ्यांत वापरून हिवताप, क्षयताप दुर करतात. मि-याच्या सेवनाने तोंडाला रूचि येते पाचक रस सुटून भूक प्रज्वलित होते. वसंतकल्पात, लघूमालिनि, सुवर्णमालिनि, सारख्या औषधांत मिरे वापरले जाते.
    लिंबाच्या रसात मिरे कूटून खाल्लयास पचन चांगले होते. लहान मूले नीट जेवत नाहि, तेव्हा चिमुटभर मिरेचूर्ण मधातून चाटवावे.. जंत पोटांत असेल तर मरून बाहेर पडतात. डोळ्यावर ,, रांजणवाडि( मांजोळणि) आल्यास तिथे मिरि उगाळून लावावी . बरी होते..


भारतीय सुगंधि गरम मसाल्याचे चमत्कारिक फायदे
Total Views: 79