राजकीय
राजेश लाटकर यांच्या प्रचारासाठी राजारामपुरीत मिसळ पे चर्चा
By nisha patil - 11/15/2024 11:12:55 AM
Share This News:
राजेश लाटकर यांच्या प्रचारासाठी राजारामपुरीत मिसळ पे चर्चा
कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील इंडिया आघाडी व महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारार्थ राजारामपुरी येथे मिसळ पे चर्चा आयोजित करण्यात आली. माजी महापौर कांचनताई कवाळे, शिवाजीराव कवाळे यांचे प्रमुख उपस्थितीत ही चर्चा आयोजित करण्यात आली. राजेश लाटकर यांच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला आमदारकीची उमेदवारी मिळाली हा लोकशाहीच्या दृष्टीने आणि कोल्हापूरसाठी शुभशकुन असून जनसामान्यांच्या सेवेत कायम कार्यरत असलेल्या या कार्यकर्त्याला आमदार करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नांची परिक्रष्ट करावी असे असे मनोगत माजी महापौर कांचनताई कवाळे यांनी व्यक्त केले.
नगरसेवक म्हणून व स्थायी समितीत त्यांनी उत्कृष्ट काम केले असून त्यांचे दरवाजे जनतेसाठी सदैव उघडे असतात. सेवादलाच्या पार्श्वभूमीतून आल्यामुळे जनसामान्यांशी त्यांची नाळ जोडली गेली आहे. राजेश लाटकर आमदार होणे म्हणजे तुम्ही आम्ही सर्वजण आमदार होण्यासारखं आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. शिवाजीराव कवाळे यांनी सर्वसामान्य मतदारांच्या आशीर्वादाने राजेश लाटकर नक्की विजय होतील अशी आशा व्यक्त केली. "उत्तरच एकच उत्तर... राजेश लाटकर" असे सांगून ते म्हणाले कोल्हापूरची जनता स्वाभिमानी असून कार्यकर्त्याला आमदार बनवण्याची संधी ते सोडणार नाहीत.
यावेळी बोलताना राजू लाटकर म्हणाले मी अनेक वर्ष कोल्हापूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम केले आहे त्यामुळे तुमच्या समस्यांची मला बऱ्यापैकी माहिती आहे. या समस्या निश्चितच सोडवू पण आपल्यापैकी कोणत्याही घटकाला माझ्याकडून कसलाही त्रास होणार नाही याची ग्वाही मी आज सर्वांसमोर देतो. खाद्यतेल व जीवनावश्यक वस्तूंचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. या प्रचंड महागाईमुळे सर्वसामान्य जनतेची दिवाळी सुध्दा कडू झाली. महायुती सरकारचे भांडवलशाही धोरणामुळे मध्यमवर्गीय व सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर बहिणींसाठी योजना आणली पण त्यात सुद्धा धमक्या दिल्या जात आहेत. याउलट महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दरमहा तीन हजार रुपये, महिला सुरक्षितता, जातीनिहाय जनगणना, आरक्षणाच्या ५० टक्केच्या मर्यादेत वाढ, शेतकऱ्यांना सवलती अशा विविध योजना जाहिरनाम्यातून जाहीर केल्या आहेत. महाविकास आघाडीचा हा जाहीरनामा म्हणजे विकासाची पंचसुत्री आहे. तरी आपण सर्वांनी जाहिरनाम्यात समाविष्ठ बाबी, लोकोपयोगी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोच करावी व महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी माझ्या प्रेशर कुकर या चिन्हा पुढील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले.
शहर भकास करून स्वतःचा आणि कुटुंबीयांचा विकास करणाऱ्या विरोधी उमेदवाराला पराभूत करून कोल्हापूर शहरातील दहशतीचे वातावरण संपवूया असे आवाहन लाटकर यांनी केले. यावेळी उपस्थित नागरिकांनी लाटकर यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी दिव्यानी आकाश कवाळे, राजश्री भोसले, अरविंद माने, शकुंतला दाभाडे, अंजना भंडारे, जयश्री चव्हाण, संजीवनी भंडारे, अलका कांबळे, मालन शिंदे, सारिका कवाळे, राणी कवाळे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
राजेश लाटकर यांच्या प्रचारासाठी राजारामपुरीत मिसळ पे चर्चा
|