बातम्या

मिशन गगनयान आहे तरी काय?

Mission Gaganyaan though


By nisha patil - 10/21/2023 1:39:25 PM
Share This News:



गगनयान हे भारताचे पहिले Human Space Mission आहे. हे मिशन तीन दिवसांचे असेल. यामध्ये तीन सदस्य असतील. त्यांना पृथ्वीच्या कक्षेत 400 किलो मीटरवर पाठविण्यात येईल. त्यानंतर या सदस्यांना सुरक्षितपणे समुद्रात उतरविण्यात येईल. यात यश आले तर अमेरिका, चीन आणि रशियानंतर अशी कामगिरी करणारा भारत हा चौथा देश असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार गगनयान मोहिमेसाठी जवळपास 90.23 अब्ज रुपये खर्च झाले आले आहेत.
   

भारताच्या गगनयान मोहिम यशस्वी झाल्यास भारतीय अंतराळवीरांना अंतराळाचा अभ्यास, संशोधन आणि अंतराळाचे वातावरण समजून घेण्याची संधी मिळेल. या मोहिमेमुळे अंतराळ संशोधनात भारताला मोठी झेप घेता येईल. तसेच इतर मोहिमांना पण त्याचा फायदा होईल. या मोहिमेमुळे जागतिक स्तरावर भारताचा दबदबा तयार होईल हे नक्की.


मिशन गगनयान आहे तरी काय?