बातम्या

बंगळुरुच्या चोर बाजारात परदेशी व्लॉगरसोबत गैरवर्तन

Mistreatment of foreign vlogger in Bangalores Chor Bazar


By nisha patil - 6/13/2023 7:24:13 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम नेदरलँडच्या एका युट्यूब व्लॉगरशी झालेल्या गैरवर्तनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे .बंगळूरच्या एका गजबजलेल्या मार्केटमध्ये ही घटना घडली आहे .या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विदेशी व्लॉगरच्या व्हिडीओमध्ये ही घटना कैद झाली आहे. या प्रकरणी बेंगलोर स्थानकात  गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. हल्ला करण्यात आलेल्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती बंगळूरु वेस्ट डिव्हिजनचे डीसीपी लक्ष्मण बी निमबारगी यांनी दिली आहे.नेदरलँड येथील व्लॉगर आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युअन्सर पेड्रो माता सध्या भारतात आला आहे. भारतात तो बंगळुरूमध्ये चोरबाजारामध्ये फिरत असताना  स्थानिक दुकानदारने त्याच्याशी गैरवर्तन केले.  गैरवर्तन करणारा व्यक्ती चोर बाजारामधील दुकानदार आहे. पेड्रोने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी दुकानदाराला धारेवर धरले आहे. अतिशय लाजिरवाणी गोष्ट, लवकरात लवकर दुकानदारावर कारवाई करा, देशात आलेल्या पाहुण्यांचा अपमान आहे, अशा प्रतिक्रिया येत आहे. या व्हिडीओमध्ये  पेड्रोने घडलेल्या प्रसंग सांगितला आहे.


बंगळुरुच्या चोर बाजारात परदेशी व्लॉगरसोबत गैरवर्तन