बातम्या
पारंपरिक उकडीचे मोदक
By nisha patil - 9/19/2023 7:11:23 AM
Share This News:
घटकउकड साठी :
2 कप मोदकाचे पीठ/ तांदूळ पीठ
2 कप पाणी
2 टीस्पून तूप
2 टीस्पून दूध
1/2 टेबलस्पून मीठ
सारणासाठी :
2 टीस्पून तूप
2 कप किसलेले खोबरे
1.5 कप किसलेला गूळ
1 टीस्पून वेलची पूड
1 टीस्पून खसखस
5 टेबलस्पून बारीक चिरलेले काजु-बदाम
स्टेप 1
सुरुवातीला आपण उकड काढून घेऊ. त्यासाठी पातेले किंवा कढई गॅसवर ठेवा. त्यामध्ये पाणी गरम करत ठेवा. पाण्यात मीठ, तूप व दूध घाला.
स्टेप 2
पाण्याला उकळी आली की गॅस बंद करा. ह्यामध्ये तांदळाचे पीठ घाला आणि पटपट मिक्स करून घ्या. भांड्यावर घट्ट झाकण घाला. कमीत कमी पंधरा मिनिट तरी पीठ झाकून ठेवा. प्रत्येक वेळी एका वाटीची उकड काढून घेतली तर मोदक खूप सुंदर, लुसलुशीत होतात.
स्टेप 3
आता सारण करण्यासाठी एक कढई गॅसवर गरम करत ठेवा. त्यामध्ये तूप घाला. तूप गरम झाले की, त्यात खोवलेले ओले खोबरे व चिरलेला गूळ घाला. वेलची पूड, खसखस आणि काजू बदाम बारीक चिरून घाला. गूळ पुर्णपणे विरघळल्या नंतर दोन मिनिट अजून परतून घ्या आणि गॅस बंद करा. लगेच सारण एका प्लेट मध्ये काढून घ्या.जास्त वेळ सारण परतू नका त्यामुळे सारण घट्ट होते आणि मोदक भरताना फाटण्याची शक्यता असते.
स्टेप 4
आता पीठ एका परातीत घेऊन उकड थोडी गरम असताना मळायला सुरुवात करा. तेल पाण्याचा हात लावून उकड मऊ मळून घ्या. जेवढा जास्त वेळ उकड मळून घ्याल तेवढं पीठ छान तयार होईल. छोट्या लिंबाच्या आकाराचा पिठाचा गोळा घ्या आणि बोटाने दाबून-दाबून पारी कारावी. एक चमचा सारण भरून मोदकाच्या पाकळ्या करा. शेंड्याला पाकळ्या थोड्या दाबून घ्या त्यामुळे मोदकाला आकार देणे सोपे जाते.आता मोदक हळूहळू बंद करून घ्या. अशा प्रकारे सर्व मोदक तयार करून घ्या.
स्टेप 5
मोदक पात्रात पाणी गरम करावयास ठेवावे
ज्या चाळणी मध्ये मोदक उकडणार आहोत त्याला तेल लावून घ्या आणि एकेक करून मोदक ठेवून द्या. मोदक पंधरा मिनिटे वाफवून घ्यावे. थोडे थंड झाले की सर्व मोदक एका डब्यामध्ये मध्ये काढून घ्या.
स्टेप 6
मस्त लुसलुशीत मोदक तुपाबरोबर सर्व्ह करावे.
पारंपरिक उकडीचे मोदक
|