राजकीय

मोडकी लॅम्ब्रोडर स्कूटर ते शेकडो कोटींचा मालक

Modaki Lambroder scooter to owner of hundreds of crores


By nisha patil - 11/18/2024 11:15:16 AM
Share This News:



मोडकी लॅम्ब्रोडर स्कूटर ते शेकडो कोटींचा मालक : 

 मुश्रीफांचा  प्रवास डोळे पांढरे करणारा 

: ॲड सुरेश कुराडे 

: भादवण येथील जाहीर सभेस उस्फुर्त प्रतिसाद 

 मोडक्या लॅम्ब्रोडर स्कूटर वरून फिरणारे हसन मुश्रीफ पाच हजार कोटींचा मालक कसे बनले. त्यांचा हा प्रवास डोळे पांढरे करणारा असून याचे उत्तर मुश्रीफांनी जनतेला द्यावे. त्यांचा ही मोहमाया सर्वसामान्याना विचार करावयास लावणारा आहे. असा घणाघात ॲड सुरेश कुराडे यांनी केला.
         भादवण (ता.आजरा) येथे आयोजित महाविकास आघाडीच्या उमेदवार समरजीतसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. 
   ॲड कुराडे म्हणाले," स्व. सदाशिव मंडलिक यांनी आपल्या मुलाला बाजूला ठेवून हसन मुश्रीफ यांना आमदार, मंत्री केले. पण या पट्ट्याने त्यांच्यासह विक्रमसिंह घाटगे,बाबा कुपेकर, श्रीपतराव शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांचा विश्वासघात केला. असा हा गद्दार प्रतिनिधी या निवडणुकीतून बाजूला करूया. आता जागे व्हा आपण मराठे आहोत. सर्वजण शिवरायांचे मावळे आहोत. गनिमी काव्याने समोरच्या मोघलशाहीचा सुपडासाफ करूया. आणि स्वराज्याची नवी क्रांती घडवूया."
     

समरजीतसिंह घाटगे म्हणाले," गावागावातील बहुजन समाजाचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा पालकमंत्री हसन मुश्रीफांचा डाव उधळून लावा. मुश्रीफांनी  सत्ता आणि पैशाच्या जोरावर ठराविक लोकांची दंडेलशाही, हुकूमशाही सुरू केली आहे. माय बाप जनतेने स्वतः निर्णय स्वतः घेऊन या निवडणुकीत मतदान करावे.
     समरजीतसिंह घाटगे म्हणाले," कागल, गडहिंग्लज, उत्तूर मतदारसंघात संविधान धोक्यात आले. लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे. भयमुक्त लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी या निवडणुकीत हसन मुश्रीफांना पराभूत करणे काळाची गरज आहे. पंधरा वर्षे तुम्ही त्यांना मतदान केले. 
त्यांची सर्वाधिक पाठराखण उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघाने केली आहे. एक वेळ मला संधी द्या. तुमचा विकास, तुमचे परिवर्तन पुढार्‍यांच्या हातात देऊ नका. तुम्ही तुमचा निर्णय घ्या. आणि या परिवर्तनाची पाठराखण करा.
     

    ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेब यांनी पालकमंत्र्यांना युवकांचे भवितव्य घडविण्यासाठी व महिला सक्षमीकरणासाठी सर्वाधिक सत्ता मुश्रीफांना दिली. मात्र त्यांनी युवकांना बेरोजगार व व्यसनाधीन करून एक पिढी बरबाद केली. सात हजार कोटी रुपयांचा निधी आणला म्हणणाऱ्या मुश्रीफांनी महिला सक्षमीकरण, शाळा व आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी किती निधी आणला याचा महिलांनी विचार करावा."
     स्वागत व प्रास्ताविक हरिष देवरकर यांनी केले. यावेळी शिवाजी गुरव निवृत्ती देसाई रणजीत गाडे दयानंद भोपळे टी बी.मुळीक यांनी मनोगत व्यक्त केले. सभेस शैलेश मुळीक, जयसिंग पाटील, मारुती देसाई, शिवाजी कुंभार, अमोल हळवणकर,संदीप सुतार उपस्थित होते. आभार शैलेश मुळीक यांनी मानले.
---
  हा कसला पळपुटा पालकमंत्री.. 

ईडी कुणाच्याही मागे लागत नाही. हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करण्याच्या मागे ईडी लागते. मुश्रीफांनी शेकडो कोटी रुपयांचा गैरव्यहार केला म्हणूनच त्यांच्या मागे ईडी लागली. ईडी दारात आल्यावर मागच्या दाराने पळून जाणारा हा कसला पळपुटा  पालकमंत्री.  असे घणाघाती टीका शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी भोकरे यांनी केली.
 


मोडकी लॅम्ब्रोडर स्कूटर ते शेकडो कोटींचा मालक