बातम्या

आधुनिक जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर सर्व शासकीय विभागांनी करावा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

Modern GIS technology should be used by all government departments


By nisha patil - 3/4/2024 7:13:12 AM
Share This News:



आधुनिक जीआयएस पोर्टलचा उपयोग विविध पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये समन्वय साधून कार्यक्षमता वाढवण्यासाठी तसेच योग्य नियोजन, अचूक निर्णय घेण्यासाठी, जिल्ह्याची आर्थिक वाढ आणि विकासाला गती देण्यासाठी करा, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. पीएम गति शक्ती - नॅशनल मास्टर प्लान अंतर्गत एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा राजाराम कॉलेज, कोल्हापूर येथे संपन्न झाली. नियोजन विभाग व महाराष्ट्र सुदूर संवेदन उपायोजना केंद्र, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन्स सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी करण्यात येणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन अमोल येडगे, जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी डॉ. अशोक जोशी संचालक, महाराष्ट्र सुदूर संवेदन उपायोजना केंद्र, नागपूर, डॉ. स्मिता धिरडे, गार्डियन सायंटिस्ट तसेच विजय पवार जिल्हा नियोजन अधिकारी, अमित सुतार, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी, डॉ. अरुण धोंगडे, जिल्हा संसाधन सल्लागार, जिल्हा विकास आराखडा व इतर जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

प्रत्येक विभागाने योजनांची अंमलबजावणी करताना तंत्रज्ञानाचा वापर करावा. या पोर्टलमूळे योजनांची अंमलबजावणी करताना अचूकता मिळणार आहे. महसूल मिळवतानाही या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला पाहिजे असे जिल्हाधिकारी यांनी आपल्या मनोगतामधे सांगितले. पुढच्या वर्षीपासून जीआयएसचा वापर अनिवार्य करा अशा सूचनाही त्यांनी नियोजन विभागाला दिल्या. यासाठी शहरातील महाविद्यालय व तेथील विद्यार्थ्यांची या तंत्रज्ञानासाठी मदत घ्यावी असे ते म्हणाले. यावेळी रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन्स जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी, वेळेवर आणि अचूक माहिती प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जीआयएस तंत्रज्ञानचा उपयोग हा विभाग निहाय नियोजन व अंमलबजावणी साठी करावा असे आवाहन श्री. विजय पवार यांनी केले. रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन्स जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी तसेच आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीवर जास्तीत जास्त परिणाम सुनिश्चित करण्यासाठी समक्रमित नियोजन आणि अंमलबजावणी महत्वपूर्ण ठरणार आहे. या कार्यशाळेत जिल्यातील अधिकाऱ्यांना त्यांच्या नियोजन प्रक्रियेत रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन्सचा निगडीत विभाग निहाय डेटा लेयरचे प्रशिक्षण देण्यात आले.


आधुनिक जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर सर्व शासकीय विभागांनी करावा – जिल्हाधिकारी अमोल येडगे