बातम्या

आधुनिक कोल्हापूर

Modern Kolhapur


By nisha patil - 3/20/2024 7:30:10 AM
Share This News:



कोल्हापूर हे दक्षिण महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक सर्वच क्षेत्रात कोल्हापूरने घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. कोणतेही नव्याने होणारे बदल योग्य प्रकारे स्वीकारून आपल्या योग्य परंपरा पुढे ठेवण्याची कला कोल्हापूरला योग्य प्रकारे साधली आहे.

अर्थव्यवस्था
कोल्हापूर जिल्ह्यासहित कोल्हापूर शहराची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. ऊस हे येथील महत्त्वाचे पीक आहे साहजिकच उसावर आधारित उद्योगधंद्याना इथे मोलाचे स्थान आहे. कोल्हापूर शहरात राजाराम सहकारी साखर कारखाना आहे. कोल्हापुरी गूळ अखिल भारतातला उत्कृष्ट गूळ समजला जातो. येथे गूळ संशोधन केंद्राची स्थापनाही करण्यात आली आहे. कोल्हापूर हे येथील दुधासाठीही प्रसिद्ध असून गोकुळ, वारणा, शाहू, मयुर, स्वाभिमानी इत्यादी सहकारी दुग्धसंस्था इथे आहेत. शिवाजी उद्यमनगर, वाय.पी. पोवारनगर, पांजरपोळ या कोल्हापूर शहरात असलेल्या औद्योगिक वसाहती आहेत. फाउंड्री उद्योगात कोल्हापूरने बरीच भरारी घेतली असून लोखंडाचे सुट्टे भाग बनवणारे सुमारे ४०० कारखाने इथे आहेत. कागल फाईव्ह स्टार एमआयडीसी आहे.

वाहतूक व्यवस्था

कोल्हापूर विमानतळ
कोल्हापूर शहर रस्ते व रेल्वे मार्गांने महाराष्ट्र व देशाच्या इतर शहरांसोबत जोडले गेले आहे. मुंबई ते चेन्नई दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग ४ कोल्हापूर शहरामधून जातो. संपूर्णपणे चौपदरीकरण केलेल्या ह्या महामार्गाद्वारे पुणे, मुंबई सांगली, तसेच कर्नाटकातील बेळगाव, बंगळूर इत्यादी शहरांपर्यंत जलद वाहतूक शक्य होते. अनेक राज्य महामार्ग कोल्हापुराला कोकणाशी जोडतात. छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरातील प्रमुख रेल्वे स्थानक असून येथून देशाच्या अनेक मोठ्या शहरांपर्यंत रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत. कोल्हापूर विमानतळ कोल्हापूर शहराच्या ९ किमी आग्नेयेस असलेल्या उजळाईवाडी या ठिकाणी आहे. सध्या येथून विमानसेवा उपलब्ध आहे.

शिक्षण
कोल्हापूर शहरात खालील काही नामांकित शैक्षणिक संस्था आहेत. येथे दर्जेदार शिक्षण मिळते. त्यामध्ये सायबर (छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन आणि रिसर्च, कोल्हापूर) गेल्या ४० वर्षापासून प्रसिद्ध आहे. ही एकमेव स्वायत्त संस्था आहे ज्याला NAAC A+ मिळाले आहे आणि ह्या ठिकाणी संशोधनपण होते. पर्यावरण व्यवस्थापन या विषयामध्ये एम.बी.ए. व पर्यावरण व सुरक्षा या विषयामध्ये एम.एस्सी. असे नावीन्यपूर्ण पदव्युत्तर अभ्यासक्रम इथे उपलब्ध आहेत. इ.स. १९६२मध्ये स्थापन झालेले शिवाजी विद्यापीठ हे देशातील एक अग्रगण्य विद्यापीठ म्हणून ओळखले जाते.

कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र सरकारने शिवाजी विद्यापीठाची स्थापना केली आहे. जिल्ह्यातील गारगोटी येथे परिपूर्ण शिक्षणाची सोय आहे. महावीर कॉलेज, श्रीमती ताराराणी ट्रेनिंग कॉलेज, राजाराम कॉलेज, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर हे देखील येथील अग्रगण्य शिक्षण केंद्र आहे.


आधुनिक कोल्हापूर