बातम्या
सोलापुरातील घरे पाहून मोदी झाले भावूक, म्हणाले...
By nisha patil - 1/19/2024 5:09:50 PM
Share This News:
सोलापूर : राजकारण आरोप-प्रत्योरोप होत असतो. परंतु आमचा मार्ग विकास आहे. यामुळे देशातील चार कोटी लोकांना आम्ही पक्के घरे देऊ शकलो. या लोकांना किती आनंद झाला हे त्यांनाच विचारा. देशात दीर्घकाळपर्यंत गरीबी हाटव नारे लावले गेले. परंतु गरीबी गेली नाही. कारण गरीबांच्या नावावर योजना होत होत्या. परंतु त्याचा लाभ योग्य लाभार्थीला मिळत नव्हता. म्हणजे आधी सरकारची नीती, निष्ठा आरोपीच्या पिंजऱ्यात होती. परंतु आता तुम्ही बघितलेले दिवस तुमच्या मुलांना बघायला मिळणार नाही. झोपडीऐवजी आता पक्के घरात तुम्हाला राहण्यास मिळणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरात सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पीएम आवास योजने अंतर्गत देशातील सर्वात मोठ्या सोसायटीचे लोकार्पण आज सोलापुरात झाले. मी ही घरे पाहिली, त्यानंतर मला या घरांचा हेवा वाटला. लहाणपणी आम्हाला असे घर मिळाले असते तर…हे सांगताना नरेंद्र मोदी यांचा कंठ दाटून आला. महाराष्ट्रातील एक लाख लोकांना हक्काचे घर मिळत आहे. आम्ही चार कोटी पेक्षा जास्त पक्के घरे बनवले आहे.
सोलापुरातील घरे पाहून मोदी झाले भावूक, म्हणाले...
|