बातम्या

मोदी सरकार ॲक्शन मोडवर...

Modi government on action mode


By nisha patil - 12/13/2023 3:40:14 PM
Share This News:



 जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमती गेल्या सहा महिन्यांतील निच्चांकावर आल्या आहेत. किंमतीतील ही घसरण पेट्रोलियम कंपन्यांच्या पथ्यावर पडली आहे. अमेरिकन तेल 70 डॉलरपेक्षा कमी तर आखाती देशातील कच्चे तेल 73 डॉलर प्रति बॅरलवर आले आहे. या किंमतीत घसरणीचा अंदाज आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पेट्रोल-डिझेलमध्ये स्वस्ताई येऊ शकते.

 कच्चा तेलाच्या किंमती गेल्या सहा महिन्यांतील सर्वात कमी स्तरावर, निच्चांकावर आल्या आहेत. अमेरिकेतील कच्चे तेल 70 डॉलरपेक्षा कमी तर आखाती देशातील कच्चे तेल 73 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरले आहे. या किंमतीत अजून घसरणीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे जानेवारी 2024 पासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात होऊ शकते.
गेल्या एका वर्षात महागाईच्या आघाडीवर मोदी सरकारला मोठे यश हाती आले नाही. सरकारचे दावे आणि प्रत्यक्षातील परिस्थितीत मोठा फरक दिसून आला. लोकसभेच्या निवडणुकीत कुठलाच फटका बसू नये यासाठी केंद्र सरकारने मोठी तयारी केली आहे. महागाई दर 4 टक्क्यांच्या टप्प्यात आणण्यासाठी मोठी कवायत करण्यात येत आहे. यावेळी मोदी सरकारला हवामानाने पण साथ दिली नाही. त्यामुळे ठोस उपाय योजनांवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे इंधनाच्या दरात कपात करण्याचा निर्णय होऊ शकतो. महागाई दर खाली आल्यास रेपो दर कमी होईल आणि ईएमआय पण कमी होईल.जागतिक बाजारात मोठी घडामोड घडली आहे. युक्रेन-रशिया युद्धाला दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तर तर इस्त्राईल आणि हमास युद्ध दोन महिन्यांपासून सुरु आहे. तरीही जागतिक बाजारात तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. त्यात अजून घसरणीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.


मोदी सरकार ॲक्शन मोडवर...