बातम्या

ऐन आयपीएलच्या काळात मोहम्मद शमी अडचणीच्या भवऱ्यात

Mohammed Shami is in trouble during the IPL


By surekha -
Share This News:



ऐन आयपीएलच्या काळात मोहम्मद शमी अडचणीच्या भवऱ्यात

भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या  अडचणी वाढू होऊ शकते. शमीची पत्नी हसीन जहाँने  शमीच्या अटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हसीन जहाँने तिच्या याचिकेत कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिलं आहे. यामध्ये शमीविरुद्ध जारी केलेल्या अटक वॉरंटवर सत्र न्यायालयाने स्थगिती दिली होती. शमीची पत्नी हसीनने आता त्याच्या अटकेसाठी सुप्रीम कोर्टाचं दारं ठोठावलं आहे. 
शमीच्या पत्नीने कोर्टात याचिका दाखल केली आहे. पत्नी हसीन जहाँने शमीवर आरोप केले आहेत. तिच्या आरोपांनुसार, शमीचे विवाहबाह्य संबंध होते आणि तो हुंड्यासाठी तिचा छळही करायचा. हसीन जहाँने याचिकेत म्हटलंय की, कायद्यानुसार कोणत्याही सेलिब्रिटीला विशेष स्थान मिळू नये. न्यायालयाचा निर्णय चुकीचा आहे.मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यात सुरू असलेला वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. जानेवारीमध्ये कोलकाता उच्च न्यायालयाने मोहम्मद शमीला पत्नीला दरमहा 1.30 लाख रुपये देण्याचे आदेश दिले होते. तर पत्नीने 10 लाखांची मागणी केली होती. यादरम्यान शमीच्या अटकेलाही स्थगिती देण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे संतप्त झालेल्या हसीन जहाँने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे


ऐन आयपीएलच्या काळात मोहम्मद शमी अडचणीच्या भवऱ्यात