बातम्या

साताऱ्यातील कुप्रसिध्द गुन्हेगार अजय ऊर्फ लल्लन जाधव यांच्या " लल्लन गँग " विरुध्द मोक्का

Mokka against the Lallan Gang of Ajay alias Lallan Jadhav a notorious criminal from Satara


By nisha patil - 4/23/2024 7:46:05 PM
Share This News:



कोल्हापूर :प्रतिनिधी  समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांना सातारा जिल्हयामध्ये तसेच सातारा शहरातील प्रतापसिंहनगर खेड, सातारा परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर लक्ष केंद्रीत करुन सराईत गुन्हेगार, टोळीची दहशत निर्माण करुन आर्थिक व इतर फायदयाकरीता संघटीतपणे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अन्वये प्रभावी करावाई करण्याबाबत जिल्हयातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना सुचना दिलेल्या आहेत. सातारा शहर पोलीस ठाणे सदर गुन्हयातील फिर्यादी हे त्यांचे घरी झोपले असताना टोळी प्रमुख १) अजय ऊर्फ लल्लन जाधव व टोळी सदस्य २) राजु उर्फ बन्टी नवनाथ लोमटे, ३) ओंकार भारत देढे, ४) विकास रमेश खुडे, ५) ऋत्वीक उर्फ रोहित लक्ष्मण उकीर्डे, ६) मधुरमा दत्तात्रय जाधव, ७) अनिता दत्तात्रय जाधव, ८) दत्तात्रय उर्फ
गद-या काशीनाथ आसवरे, ९) जय अमर कांबळे १०) सुनिल सुखदेव वाघमारे, ११) मच्छिंद्र उर्फ टकल्या भागवत बोराटे, १२) किरण नागनाथ उकिर्डे, १३) सागर रामा खुडे, १४) विजय उर्फ बबल्या जाधव, १५) पमी उर्फ पमीता दत्तात्रय बोराटे उर्फ जाधव, १६) सुनिता दत्तात्रय जाधव सर्व रा. प्रतापसिंहनगर, खेड ता. जि. सातारा यांनी एकत्र मिळुन हातात तलवारी, कोयते, लाकडी दांडकी घेवुन फिर्यादीचे घरावर दगडफेक करुन फिर्यादीचे घराचा दरवाजा तोडुन आत प्रवेश करुन फिर्यादीचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन फिर्यादीचे पोटात तलावर भोकसुन फिर्यादीस जखमी केले तसेच टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांनी हातात तलवारी, कोयते, लाकडी दांडकी घेवुन प्रतापसिंहनगर खेड सातारा येथे
दहशत माजवत गाडयाच्या काच फोडुन नुकसान करुन टोळी प्रमुख अजय ऊर्फ लल्लन जाधव याने मी प्रतापसिंहनगर चादादा आहे माझ्या नादाला लागला तर जिवंत सोडणार नाही असे म्हणुन दहशत केली. म्हणुन वगैर दिले तक्रारीवरुन सातारा शहर पोलीस ठाणेत गुन्हा रजि. नोंद करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयाच्या तपासामध्ये टोळी प्रमुख अजय ऊर्फ लल्लन जाधव रा. प्रतापसिंहनगर खेड सातारा व त्यांचे साथीदारांनी त्यांच्या टोळीची दहशत निर्माण करुन आपल्या आर्थिक व इतर फायदयाकरीता संघटीतपणे गुन्हे केलेले असल्याचे निष्पन्न झालेने पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, सातारा शहर पोलीस ठाणे यांनी नमुद टोळी विरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांची माहिती संकलित केली असता त्यांचेवर जुलुम जबरदस्ती करुन हिंसाचाराची धमकी देऊन किंवा अन्य अवैध्द मार्गाने दहशत व बळाचा वापर करुन खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, चोरी करणे, जबरी चोरी
करणे, दरोडा टाकणे, दरोडयाची तयारी करणे, जबर दुखापतीसह दरोडा टाकणे, घरफोडी, शासकीय कामात अडथळा आणणे, विनयभंग करणे, बलात्कार करणे, जबर दुखापत करणे, अपहरण, गृह अगळीक करणे, गर्दीमारामारी, हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करणे, शिवीगाळ करणे, दमदाटी करणे. अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने सदर आरोपींचेविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अन्वये कारवाई करीता  सातारा यांचे मार्फतीने  विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र कोल्हापुर यांच्याकडे मोक्का अंतर्गत प्रस्ताव सादर केला.
सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र कोल्हापुर यांनी सदर घटनेची पडताळणी करुन सदर गुन्हेगारींची वाढती दहशत मोडीस काढुन सामान्य जनतेच्या मनातील भीती नष्ट करण्यासाठी सदर टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांचे कागदपत्रांचे अवलोकन करुन मोक्का प्रस्तावाची पडताळणी करुन सदर गुन्हयास मोक्का कायदयान्वयेची कलम वाढ करणेची परवानगी देवुन गुन्हयाचा पुढील तपास श्री. राजीव नवले उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा यांच्याकंडे देण्यात आलेला आहे. माहे नोव्हेंबर २०२२ पासुन १० मोक्का प्रस्तावामध्ये १२८ इसमांविरुध्द मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई केली असुन १०१ इसमांविरुध्द हददपारी सारखी व ०९ इसमास  कायदयान्वये स्थानबध्द करणेत आलेले आहे. तसेच भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचे विरुध्द मोक्का, हददपारी,  अशा प्रकारच्या कठोर कारवाई करणेत येणार आहेत.


साताऱ्यातील कुप्रसिध्द गुन्हेगार अजय ऊर्फ लल्लन जाधव यांच्या " लल्लन गँग " विरुध्द मोक्का