विशेष बातम्या

मान्सून एक्सप्रेस’ विदर्भात; हवामान विभागाची माहिती

Monsoon Express in Vidarbha


By nisha patil - 6/23/2023 4:14:52 PM
Share This News:



जून महिना संपत आला तरी पावासाचं आगमन झालं नसल्यानं बळीराजासह सारेच चिंतेत होते. मात्र आता विदर्भाच्या काही भागात मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. यामुळे साऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून लवकरच महाराष्ट्राच्या अन्य भागात देखील मान्सून सक्रीय होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागानं आज दिलेल्या माहितीनुसार विदर्भाच्या काही भागात मान्सून दाखल झाला आहे. विदर्भात पुढील पाच दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे. तर पूर्व विदर्भात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे.


मान्सून एक्सप्रेस’ विदर्भात; हवामान विभागाची माहिती