बातम्या

साडेनऊ हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांना मिळाला ‘मायेची शिदोरी’ चा आधार

More than nine and a half thousand farmers got the support of 'Mayechi Shidori


By nisha patil - 1/8/2023 7:38:47 PM
Share This News:



साडेनऊ हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांना मिळाला ‘मायेची शिदोरी’ चा आधार

शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज दीड ते दोन हजार शेतकरी हळद विक्रीसाठी घेऊन येतात. त्यांना रात्रीच्या वेळी जेवणासाठी दूर अंतरावर जावे लागत असल्याची माहिती मिळाल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीस भेट देऊन पाहणी केली. तेथील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत, थेट त्यांच्यासाठी ‘मायेची शिदोरी’ हा उपक्रम सुरु केला. गेल्या ९ दिवसात ९९७० शेतकरी बांधवांनी मायेची शिदोरीचा लाभ घेतला. 

   

हिंगोली शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती (मोंढा) मध्ये मोठ्या प्रमाणावर हळद खरेदी विक्री व्यवहार होतो. यामुळे हिंगोली शहराचे नाव मराठवाड्यासह, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात देखील प्रसिद्ध आहे. मात्र पावसाळ्याच्या दिवसात येथील बाजार समितीमध्ये हळद विक्रीस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी जवळपास जेवणासाठी सुविधा उपलब्ध नसल्याने दुर जावे लागते. दरम्यान पाऊस आल्यास शेतकऱ्यांचा माल पावसात भिजुन नुकसान देखील होते. त्यांना राहण्याची, गाडी पार्किंग, स्वच्छतागृहाची देखील व्यवस्था नसल्याचे समजताच खासदार हेमंत पाटील यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क करुन येथील समस्यांची माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील तुम्ही प्रस्ताव सादर करा, मी निधी मिळवुन देतो असे कळविले. खासदार हेमंत पाटील यांनी दोन दिवसातच मुख्यमंत्री कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला.
   

 कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेल्या शेतकऱ्यांना राहण्याची, जेवणाची, स्वच्छतागृहासाठी आणि माल पावसात भिजु नये यासाठी ५ शेड उभारण्यासाठी १६ कोटीच्या निधीस मंजुरी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात शेतकऱ्यांना समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. 
 या उपक्रमांतर्गत शेतकरी, मालवाहु, गाडीवरील चालक, हमाल व मोंढयात राबणाऱ्या गरजवंत नागरिकांनी दिवसाला दीड ते दोन हजार लोकांनी मायेच्या शिदोरी अर्थात जेवणाचा लाभ घेतला. अनेकांनी खासदार हेमंत पाटील यांच्या अनोख्या उपक्रमाची तोंड भरुन प्रशंसा देखील केली. शेतकरी आणि कष्टकरी वर्गासाठी असेच उपक्रम राबवविले जावेत अशी आशा व्यक्त केली. 


शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया - 

मायेची शिदोरी उपक्रमांतर्गत मिळालेले जेवण अतिशय चांगले होते. यामुळे पर जिल्ह्यातून आलेल्या माझ्यासह अनेक शेतकऱ्यांची भोजनाची गैरसोय टळली. पहिल्यांदाच अशी व्यवस्था करण्यात आल्याने खासदार हेमंत भाऊ पाटील साहेबांचे धन्यवाद व असेच नवनवीन उपक्रम शेतकऱ्यांसाठी नेहमी राबवावेत.
- सोपान खेडकर, देवकरवाडी 
---------------

मायेची शिदोरी अंतर्गत सर्वसामान्य शेतकऱ्यांना पोटभर व रुचकर जेवण १० दिवस मिळाले. एवढे चांगले कार्य खासदार हेमंत भाऊ साहेबांच्या हातून घडत आहे. यामुळे शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे. 
सारंग वामन, माळसेलू 
-----------   

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २०० किलोमीटर वरून हळद विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांची उत्तम प्रकारे भोजनाची व्यवस्था करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे भविष्य नेहमी उज्वलच राहणार. अशाच प्रकारे उपक्रम नवनवीन शेतकऱ्यांसाठी राबवावेत.
गजानन शिंदे, लाख
-------------------

पर जिल्हयातून आलेल्या शेतकऱ्यांची मायेच्या शिदोरी उपक्रमामुळे समाधानाची ढेकर दिली. यामुळे मार्केट कमिटीत टाकलेल्या हळदी जवळच लक्ष ठेवत, पोटभर जेवण मिळाले. प्रथमच अशी व्यवस्था झाल्याने समाधान आहे. 
गजानन डवले, कोथळज


साडेनऊ हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांना मिळाला ‘मायेची शिदोरी’ चा आधार