बातम्या

फेसबुक लाईव्ह दरम्यान मॉरिस नोरोन्हा याने घोसाळकर याच्यावर गोळीबार

Morris Noronha fired at Ghosalkar during Facebook live


By nisha patil - 9/2/2024 5:00:21 PM
Share This News:



मुंबईतील दहिसर  परिसरातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर  यांची गोळ्या झाडून हत्या  करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा नावाच्या  स्वयंघोषित नेत्याने हा गोळीबार केला, आणि त्यानंतर नोरोन्हाने स्वतःवर गोळीबार करुन आत्महत्या केली. मॉरिस नोरोन्हा याने केलेल्या गोळीबाराच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. फेसबुक लाईव्ह दरम्यान मॉरिस नोरोन्हा याने घोसाळकर याच्यावर गोळीबार केला. मॉरिस नोरोन्हा याच्यावर याआधीही गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. हत्या, अत्याचार आणि फसवणूक यासारखे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. 
 
मॉरिस नोरोन्हा याच्यावर याआधीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर गुन्हा दाखल आहे. त्याशिवाय महिलेवर अत्याचार केल्याचाही त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दोन हत्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल होते. त्याशिवाय धमकी देण्याचाही गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. मॉरिसवर एका महिलेवर बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगचा आरोप होता. दोन वर्षांपूर्वी पोलिसांनी एका 48 वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर मॉरिस याच्याविरुद्ध बलात्कार, ब्लॅकमेल, फसवणूक आणि धमकावण्याच्या आरोपाखाली लुकआउट नोटीसही जारी केली होती. यानंतर नोरोन्हा याला अटक करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा हा अट्टल गुन्हेगार होता, असं यावरुन दिसतेय.
मॉरिस नोरोन्हा स्वत:ला सामाजिक कार्यकर्ता समजायचा, परिसरातील लोक त्याला मॉरिस भाई या नावाने ओळखत होते. बोरिवलीतील आयसी कॉलनी परिसरात समाजसेवक कार्यकर्ता म्हणून मॉरिसची ओळख होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक आणि मॉरिसमध्ये वाद सुरू होता. हा वाद संपवण्यासाठी दोघांनी फेसबुक लाईव्ह केले. अनेक नेत्यांसोबतचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मॉरिस नोरोन्हा स्वत:ला वर्णन पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ता म्हणतो.  कोविडच्या काळात त्याला काही पुरस्कारही मिळाले आहेत. 

मॉरिस याच्या सोशल मीडियावर अनेक मोठ्या राजकारण्यांसोबतचे फोटो पाहायला मिळतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतही त्याचा फोटो आहे. अभिषेक आणि मॉरिसचे ऑफिस एकमेकांच्या शेजारी होते. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक राजकारणातील वर्चस्वाच्या लढाईवरून दोघांमध्ये बराच काळ राजकीय वैर सुरू होते. माॅरिस नोरोन्हा हा दहीसरमध्ये परिचित होता. तो स्वत:ला स्वयंघोषित नेता समजत होता, अशी माहिती समोर आली आहे. अभिषेक घोसाळकर आणि माॅरिस नोरोन्हामध्ये एक वर्षांपूर्वी टोकाचा वाद झाला होता. मात्र, त्यांची पुन्हा मैत्री झाली होती. मात्र, ही मैत्री आता जीवावर बेतली आहे. दोघांमध्ये पैशांवरून वाद होता, अशीही माहिती समोर आली आहे. मॉरिस नोरोन्हाने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केल्यानंतर स्वत:वरही तीन ते चार गोळ्या मारून घेत आत्महत्या केली.  माॅरिसच्या समोर आलेल्या फोटोनुसार ही तो निवडणुकीसाठी तयारी करत असल्याचे दिसून येते. 
 मॉरिस नोरोन्हाला याला शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात सामील व्हायचे होते. मॉरिस नोरोन्हा आणि अभिषेक घोसाळकर हे दोघेही प्रभाग क्रमांक 1 मधून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. दोघांमध्ये आधीपासूनच वाद होता. त्या वादावर पडदा टाकत दोघे एकत्र आले होते. पण मॉरिसने संधी साधत घोसाळकर याच्यावर गोळ्या झाडल्या.

मॉरिस जगभरातील मोठ्या कॅसिनोला भेट द्यायचा. घोसाळकर यांच्या हत्येमागे वैयक्तिक राजकीय वैमनस्य असल्याचे सांगण्यात येत आहे.गेल्या वर्षी एका फौजदारी खटल्यात मॉरिसला तुरुंगात पाठवण्यात घोसाळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मॉरिस आणि घोसाळकर यांच्यात तीव्र द्वेष होता. मात्र, त्यांच्यातील वाढत्या भांडणानंतरही मॉरिसने मैत्रीचा हात पुढे करण्याच्या बहाण्याने गुरुवारी अभिषेकला आपल्या कार्यालयात बोलावले होते


फेसबुक लाईव्ह दरम्यान मॉरिस नोरोन्हा याने घोसाळकर याच्यावर गोळीबार