राजकीय

माता-भगिनींनो,महिलांचा अपमान की सन्मान करणारा आमदार पाहिजे हे ठरवा- नवोदिता घाटगे

Mothers and sisters decide whether you want an MLA who insults or honors women


By nisha patil - 11/15/2024 10:55:56 PM
Share This News:



माता-भगिनींनो,महिलांचा अपमान की सन्मान करणारा आमदार पाहिजे हे ठरवा- नवोदिता घाटगे

कागलमधील कोपरा सभांसह बैठकांना महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद

कागल प्रतिनिधी. कागलमध्ये स्व.विक्रमसिंहराजे घाटगे व माजी खासदार सदाशिव मंडलिक साहेब यांच्यात टोकाचा संघर्ष झाला.पण त्यांनी एकमेकांवर टीका करताना कधीही पातळी सोडली नाही.मात्र अलीकडे विद्यमान लोकप्रतिनिधींसह त्यांच्या कांही कार्यकर्त्यांकडून खालच्या पातळीवर जाऊन टीका होत आहे.त्यामध्ये महिलांच्याबाबतीतही अपमानकारक वक्तव्ये होत आहेत.छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी असलेल्या कागलमध्ये हे अशोभनिय आहे. माता-भगिनींनो,आता कागलचा आमदार निवडताना महिलांचा अपमान करणारा की त्यांना सन्मान देणारा आमदार पाहिजे हे ठरवा. असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे  यांनी केले.
शहरातील हणबर गल्ली,श्रमिक वसाहत व शाहू उद्यान येथे महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ झालेल्या कोपरा सभांवेळी त्या बोलत होत्या.

   घाटगे पुढे म्हणाल्या,गेल्या पंचवीस वर्षात विरोधकांनी महिला सक्षमीकरणासाठी ठोस उपक्रम राबविले नाहीत.महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.शाळा,सरकारी दवाखाने यासह सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे व इतर अनुषंगिक सुविधा नाहीत.एकीकडे निवडणूक कालावधीत हळदीकुंकू,जेवणावेळी व सहलींचे आयोजन हाच महिला सक्षमीकरणाचा अजेंडा असणारे विरोधक आहेत.तर दुसरीकडे कोणतेही संविधानिक पद नसलेल्या समरजितसिंह घाटगे  यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना लघु उद्योगासाठी प्रशिक्षण,कर्जपुरवठा,विक्री व्यवस्था ,आरोग्यविषयक उपक्रम, प्रबोधनपर व्याख्याने,विविध स्पर्धा-धार्मिक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन केले. महिला सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलणाऱ्या समरजितराजेंना आमदार म्हणून निवडून देण्यासाठी अगदी शेती शिवारातील महिलांपासून शहरी भागातील महिलाही सरसावल्यामुळे कागलमध्ये यावेळी बदल होणार आहे.
यावेळी इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.


 भारतीय संस्कृतीची चेष्टा खपवून घेणार काय?

 यावेळी  स्नेहल पाटील म्हणाल्या,विरोधकांकडून विविध आमिषे,अंगारा-भंडारा शपथींसह भारतीय संस्कृतीतील लोककलाकार असलेल्या वासुदेवांचा प्रचारात वापर करून आपल्या भारतीय संस्कृतीची चेष्टा सुरु आहे.हे आपण खपवून घेणार काय?तर सुहासिनीदेवी घाटगेंसह नवोदिता घाटगे यांचा अवमान करणारी वक्तव्ये ते वारंवार करत आहेत.यातून त्यांचा नव्हे तर तमाम माता-भगिनींचा ते अपमान करीत आहेत.कागलच्या स्वाभिमानी महिला आता हे खपवून घेणार नाहीत.

नवोदिता वहिनीसाहेब यांनी पोलिसात स्वतःहून गुन्हा नोंदविला

यावेळी माजी नगरसेविका विजया निंबाळकर म्हणाल्या,सायबर क्राईमसारख्या गुन्ह्यात आपल्यासारखी इतरांची फसवणूक होऊ नये म्हणून नवोदिता घाटगे यांनी स्वतःहून गुन्हा नोंदविला.मात्र विरोधकांकडे त्यांच्यावर बोलण्यासाठी मुद्दे नसल्यामुळे अशा गोष्टींचा ते चुकीच्या पद्धतीने  वापर करुन गैरसमज पसरवित आहेत. त्यानंतर जिल्ह्यात आणखी काही अशा घडल्या.एका  फसवणूक प्रकरणात तर त्यांचेच नाव वापरण्यात आले होते.खरं म्हणजे राजे साहेबांना या प्रकरणाचे राजकारण करता आले असते मात्र पोलीस तपासाधिन असलेल्या या घटनेवर  त्यांनी काहीही भाष्य केले नाही.


माता-भगिनींनो,महिलांचा अपमान की सन्मान करणारा आमदार पाहिजे हे ठरवा- नवोदिता घाटगे