मोटर सायकली चोरट्यास अटक,२ मोटरसायकल जप्त
By nisha patil - 3/22/2024 12:20:00 AM
Share This News:
पांडुरंग फिरींगे कोल्हापूर: जिल्ह्यात वाहन चोरीचे गुन्ह्यात वाढ झालेने गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यांना प्रतिबंध होणे करीता पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर यांना मार्गदर्शन केल्या प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी त्यांचे शाखेकडील वेगवेगळी तपास पथके तयार करुन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस बालाजी पाटील , अशोक पोवार यांना गोपनीय माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार रफिक मुल्ला, रा. खोतवाडी, ता. हातकणंगले, याचेकडे चोरीची सीबीझेड एक्स्ट्रीम मोटर सायकल असून तो सदरची मोटर सायकल घेवून आज शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ते सरनोबतवाडी रोडवर टोल नाक्याजवळ येणार आहे. अशी
माहिती मिळालेने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक
सागर वाघ यांचे पथकाने नमुद ठिकाणी सापळा लावून आरोपी नामे रफिक सलिम मुल्ला, व.व.39, रा. गजानन महाराज मठासमोर, खोतवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, मुळ रा. सरवडे, ता. राधानगरी, यास त्याचे कब्जातील चोरीचे काळे रंगाचे सीबीझेड एक्स्ट्रीम मोटर सायकलसह ताब्यात घेतले. त्याचे कब्जात मिळालेले विना नंबरप्लेट मोटर सायकलबाबत चौकशी केली असता ती चोरीची असून नमुद मोटर सायकल चोरीस गेलेबाबत राजारामपुरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 185/2024, भा.द.वि.स. क. 379 प्रमाणे गुन्हा दाखल असलेची खात्री झाली. त्यानंतर त्याचेकडे आणखी सखोल चौकशी केली असता त्याने यापुर्वी चोरलेली व त्याचे खोतवाडी, ता. हातकणंगले, येथील घराजवळ लावलेली आणखी
विना नंबरप्लेटची स्प्लेंडर मोटर सायकल दाखविली. सदरची मोटर सायकल देखील चोरीची आढळून आली. एकूण 1,00,000/- रूपये किंमतीच्या दोन मोटर सायकली जप्त केल्या आहेत. नमुद आरोपीकडुन राजारामपुरी पोलीस ठाणे, व विश्रामबाग पोलीस ठाणे, सांगली असे एकूण 02 गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीस पुढील कारवाई करीता राजारामपुरी पोलीस ठाणे येथे जमा केले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, पोलीस अधीक्षक निकेश खोटमोडे-पाटील जयश्री देसाई यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ तसेच पोलीस अमंलदार बालाजी पाटील, अशोक पोवार, वसंत पिंगळे, हिंदुराव केसरे, अमर आडूळकर व संतोष पाटील यांनी केली आहे.
मोटर सायकली चोरट्यास अटक,२ मोटरसायकल जप्त
|