बातम्या

सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, गोकुळ शिरगाव मध्ये "शिक्षक दिन" उत्साहात साजरा.

Mr Ambubai Patil English Medium School and Junior College


By nisha patil - 5/9/2024 8:32:25 PM
Share This News:



गुरुवार दि.०५ऑगस्ट २०२४ सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ,गोकुळ शिरगाव या ठिकाणी "शिक्षक दिन"उत्साहात  साजरा करण्यात आला. डॉक्टर गोपाल गावडे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले . शिक्षक दिनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला .त्यावेळी माननीय संस्थापक श्री.के .डी .पाटील सर, प्रिन्सिपल श्री.तेजस पाटील सर, व्हाईस प्रिन्सिपल सौ.एन. बी. केसरकर मॅडम,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.एस. के. पाटील मॅडम, पालक-शिक्षक  व विद्यार्थी  उपस्थित होते.
 

 कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साहात झाली. मुलांनी ही अतिशय उत्साहात कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. मुलांनी शिक्षकांचे वेश परिधान करून शिक्षक दिन खूपच उत्साहात साजरा केला. प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर गोपाल गावडे सरांनी वेगवेगळ्या उदाहरणातून मुलांनी कसे शिकावे हे मार्गदर्शन.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सकाळच्या सत्रात सीमा पाटील मॅडम यांनी केले व संध्याकाळच्या सत्रात सौ.पूजा कांबळे मॅडम यांनी केले.व कार्यक्रमाची सांगता संस्थेचे चेअरमन के. डी. पाटील सर यांनी केली.


सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, गोकुळ शिरगाव मध्ये "शिक्षक दिन" उत्साहात साजरा.