बातम्या

इंगळी गावच्या पूरबाधित ग्रामस्थांची मा. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासोबत बैठक संपन्न...

Mr of the flood affected villagers of Ingli village


By nisha patil - 10/14/2024 9:10:05 PM
Share This News:



कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) इंगळी गावातील पुरबाधित नागरिकांना सानुग्रह अनुदान लवकरात लवकर मिळावे याकरिता इंगळी गावचे शिवसेना शहरप्रमुख केशव पाटील व ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले होते. या उपोषणाची दखल घेत सानुग्रह अनुदान लवकरात लवकर पुरबाधित कुटुंबांना मिळावे तसेच या सानुग्रह योजनेची यादी बनवताना झालेल्या त्रुटी दूर करून नवीन यादी बनवून सदरील प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी यांचेकडे नव्याने सुपूर्द कराव्यात याकरिता मा. आम. डॉ. सुजित मिणचेकर व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी अप्पर तहसीलदार, मंडल अधिकारी, ग्रामसेवक व तलाठी यांना सूचना दिल्या होत्या.
 

    त्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने नवीन प्रस्ताव बनवून तो मा. जिल्हाधिकारी यांचेकडे सुपूर्द करण्यात आला असल्याची माहिती इंगळी गावचे तलाठी यांचेकडून मिळाल्यानंतर सदरील कामाला गती मिळावी याकरिता मा. आम. डॉ. सुजित मिणचेकर व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली इंगळी ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये मा. जिल्हाधिकारीसो यांचेसोबत जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे बैठक संपन्न झाली.
       

यावेळी सर्व ग्रामस्थांनी व मा.आम. डॉ. सुजित मिणचेकर यांनी सांगितलेल्या माहितीवर बोलताना मा. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांच्या कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावाची माहिती घेऊन या प्रस्तावावर सकारात्मक विचार करून, इंगळी गावातील ग्रामस्थांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी शासनाकडे तात्काळ पाठपुरावा करणार असल्याबाबत हमी दिली. 
     

यावेळी इंगळी शिवसेना शहरप्रमुख केशव पाटील, शानुर नायकवडे, डॉ. भीमराव पाटील, आनंदा पाटील, विजय शिंदे, निवास मोरे, आप्पाजी बिरंजे, मधुकर भातमारे, आप्पा मोरे, आण्णासो येळवडे, प्रकाश गाताडे, अनिता रमेश कदम हे इंगळी ग्रामस्थ उपस्थित होते.


इंगळी गावच्या पूरबाधित ग्रामस्थांची मा. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासोबत बैठक संपन्न...