बातम्या

सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, गोकुळ शिरगाव"क्रांती दिन" उत्साहात साजरा.

Mrs Ambubai Patil English Medium School and Junior College


By nisha patil - 9/8/2024 8:23:00 PM
Share This News:



सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, गोकुळ शिरगाव"क्रांती दिन" उत्साहात साजरा.                    

शुक्रवार 9,ऑगस्ट 2024 सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ,गोकुळ शिरगाव या ठिकाणी क्रांती दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
 

सामाजिक कार्यकर्ते श्री.नारायण पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले .मशाल पेटवून सर्व मान्यवरांच्या हस्ते क्रांती दिनाचे उद्घाटन झाले. त्यावेळी माननीय संस्थापक श्री.के .डी .पाटील सर, प्रिन्सिपल श्री.तेजस पाटील सर, व्हाईस प्रिन्सिपल सौ.एन. बी. केसरकर मॅडम,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.एस. के. पाटील मॅडम, श्री.दत्ता पाटील सर व श्री.सुनील पाटील सर हे मान्यवर उपस्थित होते.
मशाल पेटवून या कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साहात झाली, व श्री. श्रेयस पाटील सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मुलांनी ही अतिशय उत्साहात कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. सातवी व आठवीच्या मुलींनी देशभक्तीपर गीत सादर केले .तसेच पाचवी व आठवीच्या मुलींनी देशभक्तीपर नृत्य सादर केले.

 

प्रमुख पाहुणे श्री.नारायण पवार यांनी मुलांना त्यांच्या सुंदर "जालियनवाला बाग हत्याकांड", उद्धम सिंग यांच्या उदाहरणातून या दृश्याचे अवलोकन करून दिले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.नीता संकपाळ मॅडम यांनी केले व सौ.पूनम पाटील मॅडम यांनी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता केली.


सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, गोकुळ शिरगाव"क्रांती दिन" उत्साहात साजरा.
Total Views: 38