शैक्षणिक
सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये "मराठी राजभाषा दिन" उत्साहात साजरा.
By nisha patil - 2/28/2025 5:27:25 PM
Share This News:
सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये "मराठी राजभाषा दिन" उत्साहात साजरा.
सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ,गोकुळ शिरगाव या ठिकाणी "मराठी राजभाषा दिन "उत्साहात साजरा करण्यात आला. एडवोकेट माननिय अनिल पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वी.वा.शिरवाडकरांच्या फोटोचे पूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले.
त्यावेळी माननीय संस्थापक .के .डी .पाटील सर, प्रिन्सिपल तेजस पाटील सर, व्हाईस प्रिन्सिपल सौ.एन. बी. केसरकर मॅडम,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.एस. के. पाटील मॅडम, सौ.शोभा पाटील, सौ ज्योत्सना पाटील मॅडम सर्व समित्यांचे पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साहात झाली. सौ सुप्रिया पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मुलांनी ही अतिशय उत्साहात कार्यक्रमामध्ये भाग घेतला, मुलानी भाषणे, वेशभूषा, नृत्य,एकपात्री नाटक व नवरस सादरीकरण असे विविध कार्यक्रम मराठी भाषेच्या अभिमानासाठी प्रस्तुत केले.
प्रमुख पाहुण्या सौ.एस.के.पाटील मॅडम यांनी मुलांना मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.नीलम जाधव मॅडम यांनी केले व सौ. सीमा पाटील मॅडम यांनी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता केली.
सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये "मराठी राजभाषा दिन" उत्साहात साजरा.
|