बातम्या

सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये 'मातृ-पितृ पूजन' कार्यक्रम उत्साहात साजरा

Mrs Ambubai Patil English Medium School celebrated Matri Pitru Poojan


By nisha patil - 9/23/2024 6:52:05 PM
Share This News:



गोकुळ शिरगाव येथील सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये सोमवार, २३ सप्टेंबर २०२४ रोजी 'मातृ-पितृ पूजन' कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लिमिटेडचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षण सह.संचालक संपतराव गायकवाड होते.

मुख्याध्यापिका सौ. एस. के. पाटील आणि तेजस पाटील यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे पूजन करून कार्यक्रमात उत्साह निर्माण केला. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत, आई-वडिलांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केसरकर मॅडम यांनी केले, तर कार्यक्रमाची सांगता के. डी. पाटील सर यांनी केली.

कार्यक्रमाला पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये 'मातृ-पितृ पूजन' कार्यक्रम उत्साहात साजरा