बातम्या

सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये "श्री कृष्ण जन्माष्टमी" उत्साहात साजरी...

Mrs Ambubai Patil English Medium School celebrated Shri Krishna Janmashtami


By nisha patil - 8/26/2024 3:25:37 PM
Share This News:



सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये "श्री कृष्ण जन्माष्टमी" उत्साहात साजरी...                  

 आमदार ऋतुराज पाटील प्रमुख पाहुणे म्हणून लाभले . 

श्रीकृष्ण जन्माष्टमी चा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.लहान मुलांनी खूप सुंदर श्रीकृष्ण व राधा यांचे ड्रेस परिधान केले. त्याचबरोबर दिनांक 27 जुलै 2024 रोजी घेतलेल्या आंतरशालेय भव्य वक्तृत्व स्पर्धेचं बक्षीस वितरण करण्यात आलं. तीन ग्रुप मध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती .

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या कार्यक्रमाच्या वेळी माननीय संस्थापक श्री.के .डी .पाटील सर, प्रिन्सिपल श्री.तेजस पाटील सर, व्हाईस प्रिन्सिपल सौ.एन. बी. केसरकर मॅडम,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.एस. के. पाटील मॅडम, पालक-शिक्षक समितीचे सदस्य,ग्रामपंचायत सदस्य व विद्यार्थी  उपस्थित होते.
 कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साहात झाली, व मुलांनी ही अतिशय उत्साहात कार्यक्रमांमध्ये भाग घेतला.
प्रमुख पाहुणे माननीय श्री. ऋतुराज पाटील सरांनी मुलांना त्यांच्या सुंदर शब्दात मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. निर्मला केसरकर मॅडम यांनी केले व  कार्यक्रमाची सांगता केली.


सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये "श्री कृष्ण जन्माष्टमी" उत्साहात साजरी...