शैक्षणिक
सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, गोकुळ शिरगाव "विज्ञान दिन" उत्साहात साजरा.
By nisha patil - 2/28/2025 5:26:05 PM
Share This News:
सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, गोकुळ शिरगाव "विज्ञान दिन" उत्साहात साजरा.
शुक्रवार दि.२८ फेब्रुवारी २०२५ सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ,गोकुळ शिरगाव या ठिकाणी "विज्ञान दिन" उत्साहात साजरा करण्यात आला. माननिय नंदकुमार मोरे सर ए. पी. आय.वाहतूक नियंत्रक, दसरा चौक पोलीस स्टेशन,कोल्हापूर. हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. याप्रसंगी सर्जेराव मिठारी, सतीश एरंडोले, सुनील पाटील, टि.के.पाटील,रावसाहेब मिठारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सी.वी.रमण यांच्या फोटोचे पूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले.
त्यावेळी माननिय संस्थापक के .डी .पाटील सर, प्रिन्सिपल तेजस पाटील सर, व्हाईस प्रिन्सिपल सौ.एन.बी.केसरकर मॅडम,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.एस. के. पाटील मॅडम, प्रविण मोरे सर,आफरीन दरवाजकर मॅडम,सौ.गीता पाटील मॅडम,सर्व समित्यांचे पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साहात झाली. नंदा देसाई मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शाळेचे संस्थापक माननीय के.डी.पाटील सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. प्रवीण मोरे सरांनी मुलांना विज्ञानाचे महत्त्व पटवून सांगितले.मुलांनी ही अतिशय उत्साहात कार्यक्रमामध्ये भाग घेतला. विज्ञान दिनी मुलांचे शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले.मुलांनी भाषणे केली तसेच अतिशय उत्कृष्ट प्रतीचे प्रकल्प तयार केले.
प्रमुख पाहुण्यानी मुलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.निर्मला केसरकर मॅडम यांनी केले .मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, गोकुळ शिरगाव "विज्ञान दिन" उत्साहात साजरा.
|