बातम्या

सौ. आंबूबाई पाटील इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये 78व्या स्वतंत्रता दिनानिमित्त उत्साही सोहळा

Mrs An enthusiastic celebration of 78th Independence Day at Ambubai Patil English Medium School


By nisha patil - 8/15/2024 6:49:48 PM
Share This News:



शुक्रवार, 15 ऑगस्ट 2024 रोजी सौ. आंबूबाई पाटील इंग्लिश मिडियम हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, गोकुळ शिरगाव येथे 78व्या स्वतंत्रता दिनाचा उत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. जिल्हापरिषद सदस्य श्री. शशिकांत खोत व ग्रामपंचायत सदस्य श्री. संदीप पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ध्वज पूजन व ध्वजरोहन करण्यात आले. 

कार्यक्रमाची सुरुवात उत्साहात झाली, प्रास्ताविक श्री. श्रेयस पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांनी भाषण व देशभक्तीपर नृत्य सादर केले. वार्षिक निकालाचे बक्षीस वितरण करण्यात आले. श्री. पी.एस. मगदूम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर श्री. तेजस पाटील यांनी एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांचे शपथ विधी व प्रमोशन जाहीर केले. सूत्रसंचालन सौ. पूजा कांबळे यांनी केले. श्री. के. डी. पाटील यांनी आभार प्रदर्शनासह कार्यक्रमाची सांगता केली.


सौ. आंबूबाई पाटील इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये 78व्या स्वतंत्रता दिनानिमित्त उत्साही सोहळा
Total Views: 30