बातम्या
कु. राशी पारख कंपनी सेक्रेटरी परीक्षेत देशात प्रथम
By nisha patil - 1/9/2023 12:11:25 AM
Share This News:
कु. राशी पारख कंपनी सेक्रेटरी परीक्षेत देशात प्रथम
इचलकरंजी : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (ICSI) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या CS professionl Exam 2023 परीक्षेत श्रद्धा कॉमर्स कॉलेजची विद्यार्थिनी कु . राशी पारख हिने देशात प्रथम स्थान प्राप्त केल्याबद्दल श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट च्या वतीने ह्या गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या सत्कार समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी म्हणून गेली 20 वर्षे कार्यरत असणारे मा .श्री. अमृतलाल पारक उपस्थित होते मनोगत व्यक्त करताना श्री. पारक म्हणाले की, सार्वजनिक कंपनीच्या तुलनेत खाजगी कंपन्यांचा आपल्याला बाजारात चांगलाच प्रभाव दिसून येतो अशा औद्योगिक संबंधित क्षेत्रातील कामांची सुरळीत अंमलबजावणी करण्यासाठी प्रशिक्षित आणि उच्चशिक्षित मानवी संसाधनांना यांना खूप महत्त्व आहे याच बरोबर उच्च अधिकारी किंवा कंपनीच्या अध्यक्ष स्तरावरील लोकांना खाजगी सहकारी किंवा कंपनी सचिव यांसारख्या लोकांची देखील आवश्यकता असते. करिअरच्या दृष्टीने हे क्षेत्र अतिशय महत्त्वाचे आहे असा मौलिक कानमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा गप्पा सुद्धा मारल्या कु .राशीने आपले अकरावी बारावीचे शिक्षण सुद्धा कॉमर्स कॉलेजमधून पूर्ण केले आहे. या गुणी विद्यार्थिनीला 2021 HSC बोर्ड परीक्षेमध्ये 97.67% गुण मिळाले होते. CS परीक्षेमधील तिच्या कामगिरीत श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट चा मोलाचा वाटा आहे तिचे हे यश निश्चितच अभिमानास्पद आहे असे उद्गार श्री. ए. आर. तांबे सरांनी काढले
सदर सत्कार समारंभाला संस्थेचे चेअरमन श्री ए .आर. तांबे संस्थेचे समन्वयक श्री. एम. एस. पाटील ,सौ. सुप्रिया कौंदाडे, सौ संगीता पवार श्री .अक्षय तांबे ,श्री अभिषेक तांबे ,सौ. सृष्टी तांबे ,मधुरा कानिटकर सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते
कु. राशी पारख कंपनी सेक्रेटरी परीक्षेत देशात प्रथम
|