बातम्या

सौ नसीम बापूसो मुल्ला यांना पीएच.डी .

Mrs Naseem Bapuso Mulla received Ph d


By nisha patil - 11/20/2023 10:58:59 PM
Share This News:



विद्या मंदिर सोमवार पेठ, पन्हाळा या शाळेतील शिक्षिका सौ नसीम बापूसो मुल्ला यांनी समाजशास्त्र विषयांतर्गत शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी पदवी प्राप्त केली. त्यांनी कला, वाणिज्य, विज्ञान कोवाड महाविद्यालयातील डॉ खंडेराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर शहरातील मुस्लिम स्त्रियांचा अभ्यास या विषयावरील शोधनिबंध विद्यापीठात सादर केला. त्यांना शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ प्रतिमा पवार, डॉ  प्रतिभा देसाई ,प्राचार्य आर के शानेदिवाण  ,डॉ माने यांच्यासह पती बापूसो मुल्ला,मुलगा समी व कुटुंबीयांचे मार्गदर्शन व श्रीमती आशा आपराद यांचे आशीर्वाद लाभले.


सौ नसीम बापूसो मुल्ला यांना पीएच.डी .