बातम्या

नेहमीच गुणवंत विद्यार्थ्यांना शाहू ग्रुपचे पाठबळ श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे

Mrs Suhasinidevi Ghatge always supports Shahu Group for meritorious students


By nisha patil - 7/16/2024 9:15:28 PM
Share This News:



सभासद आणि कर्मचारी या नाण्याच्या दोन बाजू आहेत.शाहू साखर  चे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी  सभासदांच्या  मुलाप्रमाणे  कर्मचाऱ्यांच्याही मुलांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासास  प्रोत्साहन दिले. त्यांच्या पश्चात शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे  यांनीही ही परंपरा अखंडितपणे सुरू ठेवली आहे.त्यामुळे शाहू ग्रुपमधील सभासद-कर्मचा-यांची मुले अनेक महत्वाच्या विभागात अधिकारी पदावर यशस्वीपणे जबाबदारी संभाळत आहेत.याचा आम्हाला अभिमान वाटतो.अशा गुणवंत विद्यार्थ्यांना शाहू ग्रुपने नेहमीच पाठबळ दिले आहे.असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा व राज्य साखर संघाच्या संचालिका श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी केले.

   येथे श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना सेवकांच्या पतसंस्थेमार्फत कर्मचाऱ्यांच्या दहावी व बारावीतील गुणवंत  विद्यार्थ्यांच्या सत्कार व बक्षीस वितरण अशा संयुक्त प्रसंगी त्या बोलत होत्या.

   श्रीमती घाटगे पुढे म्हणाल्या,छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे.चांगले यश मिळवून त्यांनी आई-वडील, कारखाना,पतसंस्था  व शाहू ग्रुपचे नाव उज्वल करावे.
   पतसंस्थेचे चेअरमन, व 'शाहू'चे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण,व्हाईस चेअरमन बाळासाहेब बिरंजे,सर्व संचालक,कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व पालक यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
 
   पतसंस्थेचे चेअरमन  जितेंद्र चव्हाण म्हणाले,"शाहू ग्रुपचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंह घाटगे  यांच्या मार्गदर्शनाखाली बावीस वर्षांपूर्वी कर्मचारी, सभासदांच्या मुलांना प्रोत्साहन मिळावे. या उद्देशाने सभासद कल्याण निधीतून ही शैक्षणिक योजना  सुरू केली आहे.

 स्वागत सचिव धोंडीराम पाटील यांनी  यांनी केले.  विजयकुमार चौगुले यांनी आभार मानले.


नेहमीच गुणवंत विद्यार्थ्यांना शाहू ग्रुपचे पाठबळ श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे