शैक्षणिक
कु. संकल्प निर्मळे याचा नवोदय विद्यालयात निवडीनंतर सत्कार
By nisha patil - 3/29/2025 5:16:06 PM
Share This News:
कु. संकल्प निर्मळे याचा नवोदय विद्यालयात निवडीनंतर सत्कार
चर्मकार समाजातर्फे सन्मानित
टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील आणि सध्या दत्तवाड येथे राहणाऱ्या कु. संकल्प विजय निर्मळे याची जवाहर नवोदय विद्यालय, कागल येथे निवड झाली आहे. तो जिल्हा परिषद शाळा कुमार विद्यामंदिर, दत्तवाड येथे इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत आहे.
या यशाबद्दल चर्मकार समाजाच्या वतीने संकल्पचा सत्कार करण्यात आला. यावेळी समाजसेवक अर्जुन धुमाळे, माजी सैनिक लक्ष्मण निर्मळे, माजी सैनिक भागोजी निर्मळे, सचिन निर्मळे, युवराज माने, महादेव निर्मळे, नामदेव निर्मळे आदी उपस्थित होते.
कु. संकल्प निर्मळे याचा नवोदय विद्यालयात निवडीनंतर सत्कार
|