बातम्या

मधुमेहाच्या रूग्णांसाठी वरदान आहे ‘मुद्रासन’

Mudrasana is a boon for diabetic patients


By nisha patil - 11/29/2023 7:24:49 AM
Share This News:



भारतात मधुमेहाच्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जीवनशैलीतील बदलांमुळे हा आजार बळावत चालला आहे. यातील गंभीर बाब म्हणजे आता मधुमेह कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना होऊ लागला आहे. या आजारावर पथ्य आणि नियमित औषध घेणे हाच एकमेव पर्याय आहे.

अन्यथा याचे परिणाम खूपच भयंकर असतात. कधीकधी यामुळे जीवेदखील गमवावा लागतो. मात्र, मधुमेह या आजारावर योगासन हे रामबाण औषध आहे. मधुमेहापासून मुक्तता करुन घेण्यासाठी योगशास्त्राची फार मदत होऊ शकते. मुद्रासन शिकून जर त्याचा नियमित अभ्यास केला तर काही दिवसातच मधुमेहमुक्त जीवन जगता येऊ शकते.

मुद्रासन करण्यासाठी पद्मासनात बसून दोन्ही हाताला पाठीवर घेऊन उजव्या हाताने डाव्या हाताचे मनगट धरावे. त्यानंतर श्वास सावकाश बाहेर सोडताना हनुवटी जमिनीला टेकवावी. यावेळी दृष्टी समोर ठेवावी. जर हनुवटी जमिनीला टेकत नसेल तर पाठीत जास्तीत जास्त वाकण्याचा प्रयत्न करावा. ही क्रिया दररोज तीन ते चार वेळा करावी. या आसनामुळे मधुमेह कमी करण्यास मदत होते. शिवाय पोटाचा व्यायामही होत असल्याने पोट पुढे येत नाही.


मधुमेहाच्या रूग्णांसाठी वरदान आहे ‘मुद्रासन’