बातम्या

मुंबई इंडियन्सच्या फॅन्सनी सोशल मीडियावर संघ व्यवस्थापनासह हार्दिक पांड्यालाही केलं ट्रोल

Mumbai Indians fans trolled Hardik Pandya along with the team management on social media


By nisha patil - 4/3/2024 7:58:50 PM
Share This News:



मुंबई इंडियन्सच्या फॅन्सनी सोशल मीडियावर संघ व्यवस्थापनासह हार्दिक पांड्यालाही  केलं ट्रोल  

 मुंबई इंडियन्सचा कर्णधार कोण तर झोपेतून उठून कोणीही रोहित शर्माचंच नाव घ्यायचं. पण आयपीएल 2024  चं बिगुलं वाजलं अन् मुंबई इंडियन्सचं चित्र बदललं. आयपीएलमधील सर्वात यशस्वी प्रॅन्चायझींपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सनं टीम इंडियाचा ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून घोषित केलं. तेव्हापासून क्रिडाविश्वात खळबळ माजली. मुंबई इंडियन्सच्या फॅन्सनी सोशल मीडियावर संघ व्यवस्थापनासह हार्दिक पांड्यालाही ट्रोल करण्यास सुरुवात केली. रोहित शर्माचं काय? या प्रश्नानं सर्वांना हैराण करुन सोडलं? रोहित शर्मा आयपीएल खेळणार नाही या अफवांपासून ते रोहित चेन्नईमधून खेळणारपर्यंत अनेक चर्चा रंगल्या. अजुनही चर्चा सुरूच आहेत. अशातच सध्या सोशल मीडियावर हार्दिक पांड्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हार्दिक पांड्यानं एक बॉलिवूड डायलॉग आपल्या स्टाईलमध्ये म्हटला आहे. त्यावरुन सध्या क्रिडा विश्वात चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. IPL 2024 मध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स (MI) चा कर्णधार म्हणून दिसणार आहे. गुजरात टायटन्स सोडल्यानंतर हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आणि काही दिवसांनंतर फ्रँचायझीनं त्याला रोहित शर्माच्या जागी कॅप्टन बनवलं. मुंबईनं हार्दिकला कॅप्टन केल्यानं एमआयचे चाहते खूपच नाराज झाले होते.


मुंबई इंडियन्सच्या फॅन्सनी सोशल मीडियावर संघ व्यवस्थापनासह हार्दिक पांड्यालाही केलं ट्रोल