बातम्या

विदर्भावर मात करत 42 व्यांदा रणजी ट्रॉफीवर मुंबईकरानी कोरल नाव

Mumbaikars win 42nd Ranji Trophy after defeating Vidarbha


By nisha patil - 3/14/2024 9:39:53 PM
Share This News:



 रणजी चषकाच्या अंतिम सामन्यात विदर्भ संघावर विजय मिळवून, अजिंक्य रहाणेच्या  मुंबई संघानं चषकावर नाव कोरलं. मुंबईनं विदर्भाच्या  संघाचा 169 धावांनी पराभूत करत 42 व्यांदा रणजी करंडकावर आपलं नाव कोरलं. मुंबईनं दिलेल्या 538 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाचा संघ 368 धावांवर ढेपाळला. विदर्भ संघाचा कर्णधार अक्षय वाडकरची एकाकी झुंज अपयशी ठरली. 

आघाडीची फळी ढेपाळल्यानंतर विदर्भचा कर्णधार अक्षय वाडकरनं  झुंजार शतकी खेळी करुन डाव सावरला. त्याला हर्ष दुबेनं  65 धावा करुन भरभक्कम साथ दिली. उपहारापर्यंत 5 बाद  333 अशी भक्कम मजल विदर्भने मारली होती, पण उपहारानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी गिअर बदलून धडाधड विकेट काढल्या. त्यामुळे मुंबईचा विजय सुकर झालं. अक्षय वाडकरने झुंजार 102 तर हर्ष दुबेने 65 धावांची चिवट खेळी.


उपहारानंतर 5 बाद  333 वरुन विदर्भने खेळाला सुरुवात केली. मात्र तनुश कोटियनने अक्षय वाडकरला पायचित करुन मुंबईने विजयाच्या दिशेने कूच केली. यानंतर मग तुषार देशपांडेने हर्ष दुबे आणि आदित्य सरवटे यांना बाद करुन विदर्भला आणखी  धक्के दिले. त्यामुळे विदर्भची अवस्था 5 बाद 333 वरुन 8 बाद 356 अशी झाली. यानंतर मग कोटियनने यश ठाकूरला तर धवल कुलकर्णीने उमेश यादवला बाद करुन विदर्भचा दुसरा डाव 368 धावांवर संपुष्टात आणला. मुंबईकडून तनुष कोटियने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर तुषार देशपांडे आणि शतकवीर मुशीर खानला प्रत्येकी दोन विकेट्स मिळाल्या.


विदर्भावर मात करत 42 व्यांदा रणजी ट्रॉफीवर मुंबईकरानी कोरल नाव